अ‍ॅपशहर

पती-बॉयफ्रेण्डसोबतच इतरांशीही संबंध; ११ राज्यांतील महिलांचे पुरुषांहून अधिक सेक्स पार्टनर

देशातील ११ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सेक्स पार्टनर अधिक आहेत. एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. आपली प्रेयसी किंवा पत्नीशिवाय अन्य महिलांसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्यात पुरुष आघाडीवर आहेत.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2022, 8:30 pm
देशातील ११ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सेक्स पार्टनर अधिक आहेत. एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. आपली प्रेयसी किंवा पत्नीशिवाय अन्य महिलांसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्यात पुरुष आघाडीवर आहेत. अशा प्रकारचे संबंध ठेवणाऱ्या महिलांचं प्रमाण ०.५ टक्के आहे, तर पुरुषांचं प्रमाण ४ टक्के इतकं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sex partner
प्रातिनिधीक छायाचित्र


नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये १.१ लाख महिला आणि पुरुषांचा समावेश होता. काही राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सेक्स पार्टनर अधिक असल्याचं या सर्वेक्षणातील माहितीवरून उघडकीस आलं. राजस्थान, हरियाणा, चंदिगढ, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, आसाम, केरळ, लक्ष्यद्वीप, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू पुरुषांच्या तुलनेच महिलांच्या सेक्स पार्टनरची संख्या अधिक आहे.
तिकीट बुक करताना तुम्ही आम्ही दिलेला डेटा रेल्वे विकणार? तब्बल इतक्या कोटींचा प्लान तयार
महिलांच्या सेक्स पार्टनरची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक असणाऱ्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीवर नजर टाकल्यास राजस्थानचा क्रमांक वरचा आहे. या ठिकाणी प्रेयसी किंवा पत्नीशिवाय अन्य महिलांशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांचं प्रमाण १.८ टक्के आहे. तर प्रियकर किंवा पतीच्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशी शरीर संबंध ठेवणाऱ्या महिलांचं प्रमाण ३.१ टक्के इतकं आहे.
१३०० किमी पायपीट, २५ दिवस, ८ रुग्णालयं; कुटुंबाची धडपड व्यर्थ, ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
गेल्या १२ महिन्यांत आपल्या पत्नी आणि प्रेयसी व्यतिरिक्त इतर महिलांशी संबंध ठेवलेल्या पुरुषांचं प्रमाण महिलांपेक्षा अधिक आहे. पुरुषांचं प्रमाण ४ टक्के इतकं असून महिलांचं प्रमाण ०.५ टक्के आहे. २०१९ ते २०२१ च्या दरम्यान राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण करण्यात आलं. २८ राज्यं आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. ७०७ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज