अ‍ॅपशहर

womens day pm modi : महिला दिनाला PM मोदींची जोरदार ऑनलाइन खरेदी, निवडणुका होत असलेल्या राज्यांतून घेतल्या वस्तू

पंतप्रधान मोदी यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत महिलांना सॅल्यूट केला आहे. तसंच ऑनलाइन शॉपिंग करत महिलांनी तयार केलेल्या वस्तू त्यांनी खरेदी केल्या आहेत. याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2021, 6:21 pm
नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ( womens day ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( pm modi ) 'नारी शक्ती'ला सॅल्यूट केला आहे. भारताला स्वावलंबी बनवण्यात महिलांची मोठी भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण महिलांमधील आंत्रप्रेन्योरशिपला प्रोत्साहन देण्याचा प्रण केला पाहिजे. महिला दिनाच्या निमित्ताने महिला उद्योजकांकडून आपण अनेक वस्तू खरेदी ( pm modi online shopping ) केल्या आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून दिली आहे. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या वस्तूंची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi
महिला दिनाला PM मोदींची जोरदार ऑनलाइन खरेदी, निवडणुका होत असलेल्या राज्यांतून घेतल्या वस्तू


पंतप्रधान मोदींनी केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, नागालँडसह अनेक राज्यांमधून महिलांकडून काही ना काही खरेदी केलं आहे. यात निवडणुका होत असलेल्या राज्यांमधूनही ऑनलाइन खरेदी करण्यात आली आहे.

शॉलची ऑर्डर करताच आउट ऑफ स्टॉक

पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूच्या टोडा समाजातील कलाकारांनी बनवलेली शॉल खरेदी केली आहे. या शॉलवर हाताने विणकाम करण्यात आलं आहे. जवळपास तीन हजार रुपयांची ही शॉल पंतप्रधान मोदींनी ऑर्डर केली आहे. पंतप्रधान मोदींच्या ऑर्डरनंतर ही शॉल आउट ऑफ स्टॉक झाली आहे.


गोंड आदिवासींची कलाकृती खरेदी

गोंड आदिवासी महिलांनी बनवलेली एक कलाकृती पंतप्रधान मोदींनी खरेदी केली आहे. ही कलाकृती आदिवासी महिलांनी हाताने बनवलेली आहे. याला 'गोंड पेपर पेंटिंग' असं म्हटलं जातं.

नागालँडची पारंपरिक शॉल घेतली

पंतप्रधान मोदींनी नागालँडमधील प्रसिद्ध पारंपरिक शॉल विकत घेतली आहे. भारताला नागा संस्कृतीवर अभिमान आहे, असं त्यांनी म्हटलंय.


खादीचा मधुबनी पेंटेड स्टोल खरेदी

महात्मा गांधींना प्रिय होती आणि भारतात खादीचा मोठा इतिहास आहे. यामुळे खादीचा मधुबनी पेंटेड स्टोल आपण खरेदी केला. अतिशय उत्तम दर्जाची आणि नागरिकांची कल्पकता असलेले हे उत्पादन आहे, असं मोदी म्हणाले.

मोदींनी घेताच जूटचे फोल्डर आउट ऑफ स्टॉक

पश्चिम बंगालमधील आदिवासी जमातींनी बनवलेले जूटचे फाइल फोल्डरही पंतप्रधान मोदींनी विकत घेतले आहे. याचा उपयोग नक्कीच करेन, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी या जूट फोल्डरची ऑर्डर करताच ते आउट ऑफ स्टॉक झाले.


मध्य प्रदेश विधानसभेत 'लव्ह जिहाद'विरोधात 'धर्मस्वातंत्र्य विधेयक' मंजूर

आसामच्या बचत गटाकडून गमोसा घेतला

मी गमोसा घातल्याचं तुम्ही अनेदा पाहिलं असेल. आसामच्या काकटीपापुंगमधील महिला बचत गटांकडून तयार करण्यात येणारा हा गमोसा विकत घेतला आहे, असं मोदींनी सांगितलं.

बलात्काराच्या आरोपीला पीडितेशी विवाहाचा सल्ला दिला नाही : CJI बोबडे

केरळच्या महिलांकडून विकत घेतलं नीलविलक्कु

टाकाऊपासून टीकाऊ अशी ही वस्तू आहे. नाराळाच्या कवटीपासूनही महिला हाताने हे नीलविलक्कु बनवतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज