अ‍ॅपशहर

शस्त्रक्रिया करून सापाला दिलं जीवदान!

घरात साप शिरला तर अनेकांची घाबरगुंडी उडते. सापाला पकडून जंगलात सोडून देण्याऐवजी काही जण त्याला ठार मारतात. आंध्र प्रदेशातील रामचंद्रपुरम गावातील एका शेतकऱ्याच्या घरातही साप शिरला होता. भीतीनं काहींनी त्याला लाठ्याकाठ्यांनी मारलं. यात साप जखमी झाला. सर्पमित्रांनी त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात आणलं. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि त्याला जीवदान दिलं.

Amrutha Vasireddy | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2018, 4:55 pm
हैदराबाद:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spinal-cord-surgery


घरात साप शिरला तर अनेकांची घाबरगुंडी उडते. सापाला पकडून जंगलात सोडून देण्याऐवजी काही जण त्याला ठार मारतात. आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याच्या घरातही साप शिरला होता. भीतीनं काहींनी त्याला लाठ्याकाठ्यांनी मारलं. यात साप जखमी झाला. सर्पमित्रांनी त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात आणलं. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि त्याला जीवदान दिलं.

रामचंद्रपुरम गावातील ब्रह्मानंद राव या शेतकऱ्याच्या घरात साप शिरला होता. याबाबत काही गावकऱ्यांनी सर्पमित्र संस्थेला माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष सी. क्रांती आणि अन्य सहकारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच काही गावकऱ्यांनी सापाला काठी आणि दगडानं मारलं. यात साप गंभीर जखमी झाला होता. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला होता. क्रांती आणि सर्पमित्रांनी सापाला तातडीनं पशुवैद्यकीय रुग्णालयात नेलं. तेथील डॉक्टरांनी सापावर शस्त्रक्रिया केली आणि त्याला जीवदान दिलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज