अ‍ॅपशहर

यूपीत 'आयएएस विक'मधून मांसाहार गायब

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं सरकार येताच सनदी अधिकाऱ्यांच्या मांसाहारावर बंधनं आली आहेत. लखनऊमध्ये कालपासून सुरू झालेल्या 'आयएएस विक'मध्ये पहिल्यांदाच मांसाहार ठेवण्यात आलेला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Dec 2017, 6:00 pm
लखनऊ :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogi adityanath effect in a first non veg food off the menu at ias event
यूपीत 'आयएएस विक'मधून मांसाहार गायब


उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं सरकार येताच सनदी अधिकाऱ्यांच्या मांसाहारावर बंधनं आली आहेत. लखनऊमध्ये कालपासून सुरू झालेल्या 'आयएएस विक'मध्ये पहिल्यांदाच मांसाहार ठेवण्यात आलेला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश सरकार दरवर्षी 'आयएएस विक'चं आयोजन करतं. दरवर्षी मुख्यमंत्र्यांकडून लंच आणि राज्यपालांकडून राजभवनवर डिनरचं आयोजन केलं जातं. या दोन्ही वेळेच्या जेवणात नॉनवेज ठेवण्यात येतं. मात्र योगी आदित्यनाथ यांचं सरकार येताच 'आयएएस विकम'धील मांसाहारावर काट मारण्यात आली आहे. त्यामुळे आयएएस अधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

यापूर्वी २०१६ मध्ये राज्यपाल राम नाईक यांनी आयएएस विकमध्ये डिनर दिलं होतं. त्यावेळी मांसाहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. तर तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिलेल्या लंचमध्येही मांसाहार ठेवण्यात आला होता. उत्तर प्रदेशात आयएएस असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत खाण्यापिण्यात कोणतीही बंधनं पाळण्यात आली नाहीत. मात्र योगी सरकार येताच त्यावर बंधन आली आहेत. यापूर्वी २००७ ते २०१२ च्या काळात बसप प्रमुख मायावतींचं सरकार असताना 'आयएएस विक'चं आयोजनच करण्यात आलेलं नव्हतं.

हा होता मेन्यू...

> सुप व्हेजिटेबल, टोमॅटो सूप
> नान विथ बटर
> दाल फ्राय, दाल मखनी
> पनीर टिक्का, पनीर कुल्चा, मटर पनीर, शाही पनीर, पनीर कोरबा, हंडी पनीर
> शाही कोफ्ता, मसाला मशरूम, शाही मिक्स वेज
> जीरा राइस, फ्राइड राइस, राइस साधा
> गाजराचा हलवा, गुलाम जामून, मुगाची डाळ
> मिक्स रायता, जीरा रायता, पापड, दही, जीरा दही, सलाड
> कॉफी, कोल्ड कॉफी, आइस क्रीम आणि कोल्ड ड्रिंक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज