अ‍ॅपशहर

कत्तलखाने, रोड रोमिओंवर कारवाई

हिंदुत्वाच्या अजेंड्याची आणि भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्यातील सर्व कत्तलखाने बंद करण्याच्या दृष्टीने कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेश योगी यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Maharashtra Times 23 Mar 2017, 2:18 am
वृत्तसंस्था, लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogi adityanath orders cops to start work on banning slaughterhouses
कत्तलखाने, रोड रोमिओंवर कारवाई


हिंदुत्वाच्या अजेंड्याची आणि भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्यातील सर्व कत्तलखाने बंद करण्याच्या दृष्टीने कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेश योगी यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. गायींची तस्करी करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये रोड रोमिओंकडून तरुणी, महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी पो‌लिसांनी पथके तयार केली असून, बुधवारी गोरखपूरपासून मेरठपर्यंत पोलिसांनी अशा टवाळखोरांविरोधात कारवाई सुरू केली.

पान मसाल्यावर बंदी

योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी पहिली मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत सरकारी कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले असून, सरकारी कार्यालयात पान मसाला खाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज