अ‍ॅपशहर

rahul gandhi : राहुल गांधी म्हणाले, 'यूपीचे आंबे आवडत नाहीत', CM योगी बोलले, 'तुमची...'

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षा होणार आहे. पण त्यापूर्वीच यूपीचं राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधींनी आपल्याला यूपीचे आंबे आवडत नसल्याचं म्हटलं. यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टोला लगावला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2021, 2:09 am
लखनऊः सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात राहुल गांधी हे आपल्याला यूपीचे आंबे आवडत नाहीत, असं पत्रकारांना सांगत आहेत. आपल्याला आंध्र प्रदेशचे आंबे आवडतात. हा. लंगडा आंबा ठीक आहे. पण दशहरी जास्त गोड आहे, असं राहुल गांधी म्हणाले. यावर भाजप खासदार रवि किशन यांच्यानंतर आता यूपीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( yogi adityanath ) यांनी राहुल गांधींना हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींची टेस्टच फुटीरतावादी आहे, असं योगी म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogi adityanath slams rahul gandhi on heating up mango
राहुल गांधी म्हणाले, 'यूपीचे आंबे मला आवडत नाहीत', CM योगी बोलले, 'तुमची...'


तुमची टेस्टच फूट पाडणारी आहे. तुमचे फुटीरतावादी संस्कार देशाला परिचित आहेत. आपले विभाजनवादी कुसंस्कार इतके प्रभावी आहेत की फळांच्या चवीलाही त्यांनी प्रादेशिक वादाच्या आगीक खेचलंय. पण काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारताचा स्वाद एकच आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे, असं योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

Punjab Congress: तब्बल चार महिन्यानंतर अमरिंदर सिंह आणि सिद्धू एकाच मंचावर पण

यूपीला काँग्रेस आवडत नाहीः रवी किशन

योगी आदित्यनाथ यांच्याआधी गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनीही राहुल गांधींवर पलटवार केला. त्यांनी राहुल गांधींचा व्हिडिओ ट्वीट करत निशाणा साधाला. 'राहुल गांधींना उत्तर प्रदेशचे आंबे आवडत नाहीत आणि उत्तर प्रदेशला काँग्रेसला आवडत नाही, हिशेब बरोबर', असं रवी किशन म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज