अ‍ॅपशहर

सरकारी कार्यालयांत पान, गुटख्यावर योगींची बंदी

उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पान, गुटखा आणि सिगारेटबंदी केली आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपले कार्यालय असलेल्या लोक भवन इमारतीची योगींनी बुधवारी पाहणी केली. एका भिंतीवर त्यांना पान खाऊन थुंकल्याचे डाग दिसल्यावर त्यांनी तत्काळ हा आदेश लागू केला.

Maharashtra Times 23 Mar 2017, 10:48 am
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogi spots stained walls bans paan gutka in govt offices
सरकारी कार्यालयांत पान, गुटख्यावर योगींची बंदी


उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पान, गुटखा आणि सिगारेटबंदी केली आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपले कार्यालय असलेल्या लोक भवन इमारतीची योगींनी बुधवारी पाहणी केली. एका भिंतीवर त्यांना पान खाऊन थुंकल्याचे डाग दिसल्यावर त्यांनी तत्काळ हा आदेश लागू केला.

योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशातल्या सर्व शासकीय इमारतींमध्ये पॉलिथीन पिशव्यांवरही बंदी आणली आहे. या आदेशानंतर तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवरचा आदेशही काढला. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालय परिसरापासून ५०० मीटर्सपर्यंत तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. ती योगींनी उत्तर प्रदेशात लागू केली.

सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या दिवसभराच्या कामाच्या प्रगतीचे एक सादरीकरण तयार करावे, अशा सूचनाही योगींनी दिल्या आहेत. सायंकाळी ६ ते १० या वेळेत हे सादरीकरण केले जाणार आहे. यावेळी सर्व विभागाच्या मंत्र्यांनी उपस्थित राहण्याच्या योगींच्या सूचना आहेत.

योगी बुधवारी दुपारी १ वाजता लोकभवनात पोहोचले आणि सर्व विभागांना भेट दिली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, राज्यमंत्री अनुपमा जैसवाल आणि राज्यमंत्री मोहसीन रझा त्यांच्यासोबत होते. प्रधान सचिव राहुल भटनागर देखील उपस्थित होते. एका कर्मचाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाच्या या सर्व विभागांना भेट दिली नव्हती. पण योगींचे अगदी टेबल आणि फायलींवरच्या धुळीकडेही लक्ष गेले. त्यांनी अधिकाऱ्यांना कटाक्षाने स्वच्छता पाळण्याचे आदेश दिले.

यानंतर उपनिबंधक अशोक सिंग यांनी सरकारी मुख्यालये आणि प्रादेशिक विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आदेश जारी करत या सर्व कार्यालयांमध्ये पान, गुटखा आणि तंबाखूवर बंदी आणली आहे. यापैकी एकाही पदार्थाचे सेवन करताना आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा या आदेशात देण्यात आला आहे. कोणती कारवाई करण्यात येईल ते सांगण्यात आलेले नाही, मात्र निलंबनाची कारवाई असू शकते असे सूत्रांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज