अ‍ॅपशहर

क्षणात पती आणि ३ मुलं पोरकी; भर रस्त्यात तरुणाने महिलेवर झाडली गोळी

Delhi Crime News Today : दिल्लीच्या रस्त्यांवर कधी काय होईल याचा नेम नाही. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी वाढत असून आताही असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एका महिलेची भर रस्त्यात गोळी झाडून हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jan 2023, 8:46 am
नवी दिल्ली : देशात गुन्ह्यांच्या धक्कादायक घटना समोर येत असताना असाच एक भयंकर प्रकार दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात समोर आला आहे. इथे काही टवाळखोरांनी एका महिलेवर भर रस्त्यात गोळीबार केला. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पूर्ण करत असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murder news today


मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती असं या ३२ वर्षे तरुणीचे नावे आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारासरी ही घटना घडली. ज्योती आपल्या स्कुटीवरून घरी जात होत्या. त्यावेळी त्यांच्यावर गोळी झाडली. इतकंच नाहीतर त्याने महिलेची स्कुटीही चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनास्थळी बघायची गर्दी जमली होती. जमलेल्या काही लोकांनी ज्योती यांच्या जवळच्या लोकांना फोन केला आणि या घटनेबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला निहाल विहारमध्ये पती आणि त्यांच्या तीन मुलांसह राहते. महिलेच्या घरी यामुळे मोठा धक्का बसला आहे. ज्योती या जगात नाहीयेत यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. अशा प्रकारे त्यांची हत्या का झाली याबद्दल मोठा वादंग निर्माण झाला आहे. हत्येचं कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमध्ये कुटुंबीयांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज