अ‍ॅपशहर

झाकीर नाईकला सौदी अरेबियाचे नागरिकत्व

वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याला सौदे अरेबियाने नागरिकत्व दिले आहे. इंटरपोलपासून वाचण्यासाठी नाईकने सौदीकडे नागरिकत्व देण्याची मागणी केली होती. सौदी अरेबियाने ही मागणी मान्य करत नाईकला नागरिकत्व दिले आहे, असं वृत्त 'टाइम्स नाउ' वाहिनीने दिलं आहे.

Maharashtra Times 20 May 2017, 9:53 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम zakir naik gets saudi citizenship
झाकीर नाईकला सौदी अरेबियाचे नागरिकत्व

वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याला सौदे अरेबियाने नागरिकत्व दिले आहे. इंटरपोलपासून वाचण्यासाठी नाईकने सौदीकडे नागरिकत्व देण्याची मागणी केली होती. सौदी अरेबियाने ही मागणी मान्य करत नाईकला नागरिकत्व दिले आहे, असं वृत्त 'टाइम्स नाउ' वाहिनीने दिलं आहे.

नाईकची स्वयंसेवी संस्था इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (IRF) वर सरकरने बंदी घातली आहे. तसंच कोर्टानेही बंदी कायम ठेवली आहे. आयआरएफला बेकायदेशीर घोषित करण्याची ठोस कारणं आहेत. यामुळे देशाच्या सुरक्षेलाही धोका असल्याचं बंदी प्रकरणी अलिकडेच झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटलं आहे.

अटकेपासून वाचण्यासाठी झाकीर नाईक भारतातून सौदी अरेबियात पळाला. नाईकविरोधात NIA ने रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारीत केली होती. लवकरच इंटरपोल आणि सीबीआयला या प्रकरणी NIA पत्र देणारं होतं. ही नोटीस जारी झाल्यावर नाईकला जगातल्या कुठल्याही भागातून अटक करता येणार होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज