अ‍ॅपशहर

भारतीय-अमेरिकनांची हत्या?

अमेरिकेतील आयोवा प्रांतात एका भारतीय-अमेरिकन आयटी व्यावसायिकासह त्याची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळले असून मृतदेहांवर गोळीबाराच्या खुणा असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

महाराष्ट्र टाइम्स 18 Jun 2019, 1:45 pm
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murder


अमेरिकेतील आयोवा प्रांतात एका भारतीय-अमेरिकन आयटी व्यावसायिकासह त्याची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळले असून मृतदेहांवर गोळीबाराच्या खुणा असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. या प्रकरणी अद्याप कोणा संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले नाही, मात्र भारतीय-अमेरिकन समुदायाला कोणताही धोका नाही, असे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

चंद्रशेखर सुंकारा (४४), त्यांची पत्नी लावण्या सुंकारा (४१) आणि त्यांची पंधरा व दहा वर्षांची दोन मुले यांचे मृतदेह शनिवारी सकाळी वेस्ट डेस मोइन्स शहरातील त्यांच्या घरात आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. मात्र या चौघांच्याही अंगावर गोळी लागल्याच्या खुणा आहेत, असे पोलिसांनी सांगितले. ‘चंद्रा’ म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर हे आयोवाच्या जनसुरक्षा खात्याअंतर्गत टेक्नॉलॉजी सर्व्हिस ब्युरोमध्ये कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील दोन प्रौढ व दोन लहान मुले असे अन्य सदस्यही घरात पाहुणे म्हणून राहत होते. मृतदेह आढळून आले, तेव्हा नातेवाइकांपैकी एकाने मदतीसाठी घराबाहेर धाव घेतली. त्यावेळी बाहेर असलेल्या वाटसरूने पोलिसांना कळवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज