अ‍ॅपशहर

'चला हवा येऊ द्या'ची लंडन वारी!

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येऊ द्या' ची टीम आता ब्रिटनमध्ये हास्याचे कारंजे उडवणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात यशस्वी कामगिरी केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' ची टीम परदेशवारीवर निघाली आहे. सर्व प्रमथ दुबई आणि त्यानंतर युरोपमध्ये आपली कला सादर केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या'चा कार्यक्रम लंडनमध्ये होणार आहे.

Maharashtra Times 27 Oct 2017, 1:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chala hawa yeu dya show in london
'चला हवा येऊ द्या'ची लंडन वारी!


झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येऊ द्या' ची टीम आता ब्रिटनमध्ये हास्याचे कारंजे उडवणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात यशस्वी कामगिरी केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' ची टीम परदेशवारीवर निघाली आहे. सर्व प्रथम दुबई आणि त्यानंतर युरोपमध्ये विविध शहरांत आपली कला सादर केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या'चा कार्यक्रम लंडनमध्ये होणार आहे.

लंडनमधील कार्यक्रमासाठी बाराखडी एंटरटेन्मेंटने झी मराठी सोबत भागिदारी केली आहे. लंडनमध्ये येत्या १२ नोव्हेंबरला 'चला हवा येऊ द्या'चा कार्यक्रम होणार आहे. लंडन शहरातील प्रसिद्ध 'द ट्रॉक्सी' थिएटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, भाऊ कदम आणि निलेश साबळे ही सर्व टीम नेहमी प्रमाणे मराठी रसिकांना हसवणार आहेत. 'चला हवा येऊ द्या'ची ही परदेशवारी झी मराठी २०१८ पासून आपल्या वाहिनीवर प्रसारित करणार आहे.

आपल्या आवडत्या कलाकरांना भेटण्याची संधीही ब्रिटनमधील मराठी रसिकांना देण्यात येणार आहे. यासाठी 'व्हीआयपी मिट अॅण्ड ग्रीट' हा वेगळा कार्यक्रम ठेवला आहे. यावेळी मराठी रसिकांना कलाकारांसोबत सेल्फीही घेता येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज