अ‍ॅपशहर

बहरीनमध्ये महाराष्ट्र दिनाचा जल्लोष

मराठी मातीतील विविध सण, उत्सव उत्साहाने साजरे करणाऱ्या बहरीन महाराष्ट्र मंडळाने यंदाचा महाराष्ट्र दिनही जल्लोषात साजरा केला. 'गर्जा महाराष्ट्र माझा' आणि 'मदतीचा हात' या दोन कार्यक्रमांचं आयोजन मंडळानं केलं होतं.

Maharashtra Times 22 May 2017, 9:13 am
मराठी मातीतील विविध सण, उत्सव उत्साहाने साजरे करणाऱ्या बहरीन महाराष्ट्र मंडळाने यंदाचा महाराष्ट्र दिनही जल्लोषात साजरा केला. 'गर्जा महाराष्ट्र माझा' आणि 'मदतीचा हात' या दोन कार्यक्रमांचं आयोजन मंडळानं केलं होतं. त्याला मराठीजनांनी, महाराष्ट्रीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra day celebration in bahrain
बहरीनमध्ये महाराष्ट्र दिनाचा जल्लोष


भारताबाहेर, महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी माणसांना आपली संस्कृती जपता-जोपासता यावी, या उद्देशानं बहरीन महाराष्ट्र मंडळ गेली ३० वर्षे कार्यरत आहे. पाडवा, गणपती, दिवाळी यासारखे सण तिथे मिळून-मिसळून साजरे केले जातात. संगीत, नृत्य, नाट्य यासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, वैदिक गणित, संस्कृत भाषेचे वर्गही मंडळाच्या वतीने घेतले जातात.

यंदा महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात बहरीनमधील महाराष्ट्रीय महिलांनी एका नृत्याविष्कारातून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. विविध भाषांमधील गाण्यांवर हे नृत्य बसवण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भारतीय दूतावासातील राजदूतांचे सचिव आवर्जून उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकारिणीच्या अध्यक्ष कल्पना पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं या सोहळ्याचं नेटकं आयोजन केलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज