अ‍ॅपशहर

युएई महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारण समितीची घोषणा

संयुक्त अरब अमिराती येथील महाराष्ट्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अबुधाबी येथे पार पडली. या सभेत २०१६-२०१७ च्या कार्यकारिणी समितीची निवड करण्यात आली.

Maharashtra Times 1 Jun 2016, 2:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अबूधाबी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra mandal of uae
युएई महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारण समितीची घोषणा


संयुक्त अरब अमिराती येथील महाराष्ट्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अबुधाबी येथे पार पडली. या सभेत २०१६-२०१७ च्या कार्यकारिणी समितीची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचीत अध्यक्ष निखिल देव यांनी उपस्थित मंडळाच्या सभासदाना संबोधित करताना कार्यकारणी वर्षभरात नेमकेच पण दर्जेदार कार्यक्रम आयोजित करील अशी ग्वाही दिली. तसेच स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

मंडळाचा कार्यभार सांभाळण्यासाठी एक वर्षाच्या कालावधी करीता गठीत करण्यात आलेली समिती पुढील प्रमाणे: अध्यक्ष-निखिल देव, सचिव- भक्ती वैद्य आणि खजिनदार म्हणून अनुजा नेवगी यांची निवड झालेली आहे. २०१६-१७ चे विश्वस्त म्हणून निवड करण्यात आलेले प्रशांत कुलकर्णी, प्रिया पाकळे व शिल्पा आरस नवीन समितीला मार्गदर्शन करतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज