अ‍ॅपशहर

हार्वे चक्रीवादळात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सासला हार्वे चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. निखील भाटीया (२४) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो टेक्सासच्या ए अँड एम विद्यापीठाचे विद्यार्थी आहे.

Maharashtra Times 30 Aug 2017, 12:12 pm
मटा ऑनलाइन वृत्त । ह्युस्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hurricane harvey indian student dies in us
हार्वे चक्रीवादळात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू


अमेरिकेतील टेक्सासला हार्वे चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. निखील भाटीया (२४) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो टेक्सासच्या ए अँड एम विद्यापीठाचे विद्यार्थी आहे.

निखील अन्य एका भारतीय विद्यार्थीनी शालिनी सिंगसोबत ब्रायन तलावाजवळ पोहण्यासाठी गेला असता वादळाच्या तडाख्यात सापडला. त्याची शनिवारी सुटका करण्यात आली होती. पण गंभीर जखमी असलेल्या निखीलचा उपचारांदरम्यान बुधवारी मृत्यू झाला. निखील मुळचा जयपूरचा आहे. तो आणि शालिनी दोघंही पब्लिक हेल्थ या विषयाचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत होते. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आणखी २०० भारतीय विद्यार्थी देखील ह्युस्टन विद्यापीठात अडकले होते. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्या भागातल्या भारतीय-अमेरिकन लोकांनी या विद्यार्थ्यांना अन्न आणि अन्य आवश्यक सामुग्रीची मदत पुरवली. ह्युस्टनच्या भारतीय काउन्सिल जनरल अनुपम राय विद्यार्थ्यांच्या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.

ह्युस्टनमध्ये आणि आसपासच्या परिसरात सुमारे एक लाख भारतीय राहतात. या भागाला वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे, अशी माहिती समाजाच्या एका स्थानिक प्रतिनिधीने दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज