अ‍ॅपशहर

उच्च न्यायालयात आपच्या ‘अपात्रां’ची याचिका

लाभाचे पद स्वीकारल्यामुळे अपात्र ठरलेल्या आम आदमी पक्षाच्या २० आमदारांनी या निर्णयाविरोधात मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती अपात्र आमदारांनी न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि ए. के. चावला यांच्या खंडपीठासमोर केली.

Maharashtra Times 24 Jan 2018, 5:46 am
नवी दिल्ली : लाभाचे पद स्वीकारल्यामुळे अपात्र ठरलेल्या आम आदमी पक्षाच्या २० आमदारांनी या निर्णयाविरोधात मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती अपात्र आमदारांनी न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि ए. के. चावला यांच्या खंडपीठासमोर केली. खंडपीठाने ती मान्य केली असून, त्यावर आजच, बुधवारी सुनावणी घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aap


अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी आणि सरकारने केंद्रशासित प्रदेशाच्या कायद्याअंतर्गत काढलेली अधिसूचना रद्दबातल करावी, अशी विनंती आमदारांनी न्यायालयाला केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज