अ‍ॅपशहर

लाहोरमध्ये बॉम्बस्फोटात १० ठार

लाहोरमधील मॉल रोड भागात औषध विक्रेत्यांची निदर्शनं सुरू असतानाच बॉम्बस्फोट घडवण्यात आला असून त्यात किमान १० जण ठार तर ६० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती पाकिस्तानातील माध्यमांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra Times 13 Feb 2017, 8:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लाहोर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 killed and over 60 injured in suicide blast in lahore pakistan
लाहोरमध्ये बॉम्बस्फोटात १० ठार


लाहोरमधील मॉल रोड भागात औषध विक्रेत्यांची निदर्शनं सुरू असतानाच बॉम्बस्फोट घडवण्यात आला असून त्यात किमान १० जण ठार तर ६० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती पाकिस्तानातील माध्यमांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बॉम्बस्फोटात पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपमहानिरीक्षक कॅप्टन मुबीन आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक झाहीद मेहमूद यांना आपला जीव गमवावा लागला असून हा बॉम्बस्फोट आत्मघाती हल्ला असल्याचे पंजाब प्रांताचे कायदा मंत्री राणा सनाउद्दीन यांनी म्हटले आहे.

मोटारसायकलवरून हल्लेखोराने गर्दीत घुसून हा बॉम्बस्फोट घडवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज