अ‍ॅपशहर

आई शप्पथ; १४ वर्षांचा मुलगा गणिताचा प्राध्यापक!

आजची पिढी प्रचंड शार्प आहे. ज्या पद्धतीने ते प्रत्येक गोष्ट आत्मसात करतात, ते केवळ थक्क करणारंच असतं. असं असलं तरी, १४ वर्षांचा एक मुलगा इंग्लंडमधील विद्यापीठात गणित विषयाचा प्राध्यापक आहे, असं सांगितलं तर विश्वास बसेल? कन्फ्यूज झालात ना? पण हे खरं आहे. याशा एस्ले हा इराणी मुलगा पदवीचं शिक्षण घेता-घेता लेस्टर विद्यापीठात प्राध्यापकी करतोय.

Maharashtra Times 24 Sep 2017, 4:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लंडन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 year old teen is a professor in leicester university
आई शप्पथ; १४ वर्षांचा मुलगा गणिताचा प्राध्यापक!

आजची पिढी प्रचंड शार्प आहे. ज्या पद्धतीने ते प्रत्येक गोष्ट आत्मसात करतात, ते केवळ थक्क करणारंच असतं. असं असलं तरी, १४ वर्षांचा एक मुलगा इंग्लंडमधील विद्यापीठात गणित विषयाचा प्राध्यापक आहे, असं सांगितलं तर विश्वास बसेल? कन्फ्यूज झालात ना? पण हे खरं आहे. याशा एस्ले हा इराणी मुलगा पदवीचं शिक्षण घेता-घेता लेस्टर विद्यापीठात प्राध्यापकी करतोय.

वय वर्षं १४ म्हणजे तसं तर खेळा-बागडायचंच वय. शाळा कधी सुटते आणि कधी मैदानावर पोहोचतो, अशी या वयोगटातील मुलांची अवस्था असते. पण, याशा हे काहीतरी वेगळंच 'समीकरण' आहे. गणितातील त्याची अचाट बुद्धिमत्ता पाहून पालक, शिक्षक आणि मित्र त्याला 'कॅलक्युलेटर' असंच म्हणतात. वयाच्या १३व्या वर्षी याशानं लेस्टर विद्यापीठाशी संपर्क साधला. या विद्यापीठात पदवी घेण्याची आणि शिकवण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली. तेव्हा, विद्यापीठाच्या संचालक मंडळानं त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यावेळी याशानं दिलेली उत्तर पाहून समोर बसलेलं पॅनल अवाक झालं आणि त्यांनी एका झटक्यात 'अतिथी व्याख्याता' म्हणून त्याची निवड केली. याशाच्या नियुक्तीबाबतचं पत्र जेव्हा मनुष्यबळ विकास खात्याकडे गेलं, तेव्हा त्यांनीही शंका उपस्थित केली. पण याशाचं गणितातील ज्ञानापुढे त्यांनाही हात जोडावे लागले.

आता याशा लवकरच पदवी परीक्षा देणार असून त्यानंतर त्याला डॉक्टरेट करायचीय. मला विद्यापीठात नोकरी मिळाल्याचा आनंद आहेच, पण इतर विद्यार्थ्यांना मी मदत करू शकतो, ही जास्त समाधानाची गोष्ट आहे, अशी प्रांजळ प्रतिक्रिया याशानं व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज