अ‍ॅपशहर

'एचआयव्ही' ग्रस्त युवती झाली सौंदर्य स्पर्धेची विजेती

'मिस कांगो यूके' सौंदर्य स्पर्धेत हॉर्सली शिंडा वा बोंगो या एचआयव्ही ग्रस्त २२ वर्षाच्या युवतीने बाजी मारली आहे. लंडन येथील स्टॅनफर्ड टाऊन हॉल येथे झालेल्या अंतिम फेरीत हॉर्सलीने २०१७चे विजेतेपद मिळवले.

Maharashtra Times 14 Apr 2017, 5:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लंडन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 year old hiv positive woman crowned miss congo uk
'एचआयव्ही' ग्रस्त युवती झाली सौंदर्य स्पर्धेची विजेती


'मिस कांगो यूके' सौंदर्य स्पर्धेत हॉर्सली शिंडा वा बोंगो या एचआयव्ही ग्रस्त २२ वर्षाच्या युवतीने बाजी मारली आहे. लंडन येथील स्टॅनफर्ड टाऊन हॉल येथे झालेल्या अंतिम फेरीत हॉर्सलीने २०१७चे विजेतेपद मिळवले.

हॉर्सली मुळची कांगोची रहिवासी असून सध्या ती लंडनमध्ये फाइन आर्ट्सचे शिक्षण घेत आहे. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर तिने पुन्हा कांगोत जाण्याचा निर्णय घेतला आहे. कांगोमध्ये एचआयव्ही आणि एड्स रोखण्यासंदर्भातील जनजागृती कार्यक्रमात सहभागी होण्याचा हॉर्सलीने निर्णय घेतला आहे. 'फॉर ए वर्ल्ड विदाऊट एड्स' या कार्यक्रमात युवकांना एड्सपासून दूर राहण्यासाठी हॉर्सली प्रयत्न करणार आहे.

या स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्याने मी आनंदी आहे. माझ्या आयुष्यात काही तरी मिळवल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया हॉर्सलीने दिली. माझ्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल अशी आशा तिने व्यक्त केली.

पाहा मिस कांगो यूके २०१७चे विजेतेपद मिळाल्यानंतरची हॉर्सलीची भावनिक प्रतिक्रिया


La victoire de @Horcelie_sinda, #MissCongoUK, met en lumière la vie de millions d'Africains qui souffrent du #VIH 🎥🎥🎥https://t.co/kNmhy5453l pic.twitter.com/b8X2EinloF — bbcafrique (@bbcafrique) April 4, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज