अ‍ॅपशहर

मलेशियात शाळेला आग; २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

क्वालांलपूरमधील एका धार्मिक शाळेला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तहफीज दारूल कुराण इत्तिफकिया असे या शाळेचे नाव असून ती राजधानी क्वालांलपूरमध्ये आहे.

Maharashtra Times 14 Sep 2017, 11:39 am
मटा ऑनलाइन वृत्त । क्वालांलपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 people mostly students killed in school fire kuala lumpur
मलेशियात शाळेला आग; २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू


क्वालांलपूरमधील एका धार्मिक शाळेला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

दोन मजली इमारतीला लागलेल्या आगीत २३ विद्यार्थी आणि दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तहफीज दारूल कुराण इत्तिफकिया असे या शाळेचे नाव असून ती राजधानी क्वालांलपूरमध्ये आहे. शाळेला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका तासानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

मला वाटतेय गेल्या २० वर्षातील ही सर्वात मोठी आगीची घटना आहे. आगीमुळे धूर निघाल्याने श्वास कोंडून २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती फायर अँड रेस्क्यू डिपार्टमेंटचे संचालक खिरुदीन द्रहमन यांनी 'एएफपी'ला दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज