अ‍ॅपशहर

अमेरिकी कुबेरांच्या यादीत भारतीयांचा डंका

फोर्ब्स मासिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अमेरिकेतील सर्वात धनवान व्यक्तीच्या यादीत पाच भारतीय वंशांच्या धनवंतांचा समावेश आहे. या यादीत एकूण ४०० धनवान व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स या यादीत सर्वात वरच्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

Maharashtra Times 9 Oct 2016, 7:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त। न्यूयॉर्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 indian americans among americas richest people
अमेरिकी कुबेरांच्या यादीत भारतीयांचा डंका


फोर्ब्स मासिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अमेरिकेतील सर्वात धनवान व्यक्तीच्या यादीत पाच भारतीय वंशांच्या धनवंतांचा समावेश आहे. या यादीत एकूण ४०० धनवान व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे.

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स या यादीत सर्वात वरच्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

फोर्ब्स मासिकाच्या 'अमेरिकेतील सर्वात धनवान व्यक्तींची यादी-२०१६'मध्ये सिंफनी टेक्नॉलॉजीचे संस्थापक रमेश वाधवानी, आउटोसोर्सिंग फर्म सिनटेलचे सहसंस्थापक भरत नीरज देसाई, हवाई वाहतूक क्षेत्रातील राकेश गंगवाल, उद्योजक जॉन कपूर आणि सिलिकॉन व्हॅलीतील गुंतवणूकदार कवितर्क राम श्रीराम यांचा समावेश आहे.

वाधवानी या यादीत २२२ व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती तीन अरब डॉलर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

याबरोबर २.५ अरब डॉलर संपत्तीसह देसाई २७४ व्या स्थानी, २.२ अरब डॉलर संपत्तीसह गंगवाल ३२१ व्या स्थानी, २.१ अरब डॉलर संपत्तीसह कपूर ३३५ व्या स्थानी, तर १.९ अरब डॉलर संपत्तीसह श्रीराम हे ३६१ व्या स्थानी विराजमान झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज