अ‍ॅपशहर

फ्रान्समध्ये ट्रकने चिरडले; ७३ जण ठार

फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीत ट्रक घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत ७३ लोकांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले आहे.

Maharashtra Times 15 Jul 2016, 8:56 am
मटा ऑनलाइन वृत्त । नीस (फ्रान्स)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 73 feared dead as truck rams into crowd in france
फ्रान्समध्ये ट्रकने चिरडले; ७३ जण ठार


फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीत ट्रक घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत ७३ लोकांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले आहे.

फ्रान्समधील नीस शहरात फ्रेंच रिवेरा रिसॉर्टमधील ही घटना असून या ठिकाणी राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी असंख्य लोकांनी गर्दी केली होती. अचानक एका ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर अक्षरशः ट्रक घालून त्यांना चिरडले. या दुर्घटनेत ७३ जणांचा बळी गेला असून १०० जण जखमी झाले आहेत. मृत्यूंची संख्या वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाला याची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, बंदुका आहेत, अशी माहिती प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली. ट्रकमधून गोळ्या झाडल्यांचा आवाज येत होती, माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली असली तरी प्रशासनाने मात्र याला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याने हा दहशतवादी हल्ला आहे का? याचा तपास फ्रान्सचे पोलीस करीत आहेत.

दरम्यान, २०१५ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३० जणांचा मृत्यू झाला होता.

एविनोन दौऱ्यावर गेलेले फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच ते दौरा अर्धवट सोडून पॅरिसला परतणार आहेत. पॅरिसमध्ये आल्यानंतर ते अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून माहिती घेणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज