दिल्ली : आम आदमी पक्षाचे आमदार सोम दत्त यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. सोम दत्त यांनी २०१५मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान एका महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केली होती. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी हा निकाल दिला आहे. या प्रकरणी दत्त यांनी ४ जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विनयभंग आणि मारहाण प्रकरणी जास्तीत जास्त ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दत्त यांनी निवडणूक प्रचारादरम्यान १० जानेवारी २०१५ रोजी रात्री ८ वाजता तक्रारदार महिलेच्या घरी जाऊन तिला मारहाण केली आणि तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.
‘आप’आमदार दोषी
आम आदमी पक्षाचे आमदार सोम दत्त यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2019, 4:00 am