अ‍ॅपशहर

‘पाकने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत’

‘पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचेच आहे’, असे वक्तव्य करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी वाचाळपणाचे पुढचे टोक गाठत, ‘पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत’, असे वक्तव्य केले.

Maharashtra Times 16 Nov 2017, 1:56 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abdullah india should give up pursuit of acquiring pok farooq abdullah
‘पाकने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत’

‘पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचेच आहे’, असे वक्तव्य करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी वाचाळपणाचे पुढचे टोक गाठत, ‘पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत’, असे वक्तव्य केले.

उरी येथे पक्षकार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात बोलताना फारुख यांनी ही मुक्ताफळे उधळली. ‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच आहे, तो पाकच्या बापाचा नाही, असे आपण किती वर्षे घोकत बसणार आहोत? आणि तो भाग घेण्यासाठी भारत पुढे सरसावला तर पाक गप्प बसेल का... त्या देशाने हातात बांगड्या भरल्या आहेत का’, असे विलक्षण प्रश्न अब्दुल्ला यांनी यावेळी उपस्थित केले आणि, ‘त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहेत’, अशी पुस्ती जोडली. ‘युद्धाचा विचार करण्याआधी माणूस म्हणून आपल्याला उत्तमरीत्या कसे जगता येईल, याचा विचार करायला हवा’, असे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज