अ‍ॅपशहर

अमेरिकेच्या सीआयए प्रमुखांनी घेतली तालिबान नेत्याची गुप्त भेट

CIA chief meet Taliban leader अमेरिका आणि तालिबानमध्ये पडद्यामागेही चर्चा सुरू आहे. अमेरिकेने तालिबानबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसत असले तरीही विविध तालिबानींसोबत अमेरिकी अधिकारी बैठका घेत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2021, 11:17 am
काबूल/ वॉशिंग्टन: अमेरिकेची गुप्तचर संस्था (सीआयए) प्रमुख विलियम बर्न्स यांनी काबूलमध्ये तालिबानचा नेता अब्दुल गनी बरादरसोबत गुप्त भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. ' द वॉशिंग्टन पोस्ट'ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. सोमवारी ही भेट झाली असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम CIA-chief-meet-taliban
अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांनी घेतली तालिबान नेत्यांची भेट


तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर बायडन प्रशासन आणि तालिबान दरम्यान झालेली ही भेट अतिशय महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. तर, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने ३१ ऑगस्टपर्यंत आपल्या सर्व फौजा माघारी घ्याव्यात असा इशारा तालिबानने दिला होता.

पंजशीरवर आक्रमण: तालिबानचा म्होरक्या वेढ्यात अडकला!

सीआयए प्रमुखांची गुप्त बैठक

विलियम बर्न्स हे बायडन प्रशासनातील अनुभवी राजनयिक आहेत. तर, अब्दुल गनी बरादरदेखील तालिबानचे प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. तालिबानच्या राजकीय विभागाची जबाबदारी बरादरकडे आहे. तालिबान सरकारमध्ये बरादर राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे.

तालिबानची अमेरिकेला जाहीर धमकी; ३१ ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी घ्या, नाहीतर...
सीआयएच्या प्रवक्त्याने या भेटीबाबत अधिकृत भाष्य करण्यास नकार दिला असल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सीआयए प्रमुखांच्या कोणत्याही दौऱ्याबाबत संस्थेकडून भाष्य अथवा माहिती दिली जात नसल्याचे अधिकाऱ्याने 'एएफपी'ला म्हटले. 'वॉशिंग्टन पोस्ट'ने अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने या भेटीचे वृत्त दिले. या भेटी दरम्यान, कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

तालिबानकडून पाकिस्तानला अमेरिकन शस्त्रांची विक्री!
सध्या काबूल विमानतळ अमेरिकेच्या नियंत्रणात असून जवळापस ५८०० जवान तैनात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आवश्यकता भासल्यास आणखी काही दिवस अमेरिकन सैन्य काबूलमध्ये राहू शकते असे वक्तव्य केले होते. त्यावर तालिबानने प्रतिक्रिया व्यक्त करताना अमेरिकेने ३१ ऑगस्टची मुदत पाळावी असा इशारा दिला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज