अ‍ॅपशहर

अफगाणिस्तान उपराष्ट्रपतींच्या 'या' ट्विटने पाकिस्तानी ट्रोलर्सचा जळफळाट

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी केलेल्या एका ट्विटची चर्चा सुरू असून पाकिस्तानी ट्रोलर्सची तोंड बंद केली आहेत. सालेह यांना पाकिस्तानी युजर्स ट्रोल करत होते. त्यानंतर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2021, 12:04 pm
काबूल: पाकिस्तानकडून तालिबानला मिळणारा पाठिंबा उघड करणारे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे पाकिस्तानी ट्रोलर्सचा जळफळाट झाला आहे. मंगळवारी राष्ट्रपती भवनावर रॉकेट हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी उपराष्ट्रपती अमरूल्ला सालेह हे बचावासाठी काही क्षण खाली वाकले होते. त्यावरून पाकिस्तानमधील युजर्सने त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सालेह यांनी एक फोटो ट्विट करत पाकिस्तानी ट्रोलर्सचे तोंड बंद केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Afghan-vice-president
अफगाणिस्तान उपराष्ट्रपतींच्या 'या' ट्विटने पाकिस्तानी ट्रोलर्सचा जळफळाट


अमरुल्लाह सालेह यांनी सन १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील फोटो ट्विट केला. पाकिस्तानी लष्कराने भारतासमोर शरणागती पत्करत असल्याचे मान्य केले. त्याबाबतच्या अटीवर स्वाक्षरी करत असल्याचा हा ऐतिहासिक फोटो सालेह यांनी ट्विट केला. त्यांनी म्हटले की, आमच्या इतिहासात असा कोणताच फोटो नाही आणि भविष्यातही नसणार. रॉकेट हल्ला झाला तेव्हा मी काही वेळेसाठी घाबरलो होतो, हे मान्य करतो. प्रिय पाकिस्तानी ट्रोलर्स, तालिबान आणि दहशतवादामुळे तुमची ही जखम भरून निघणार नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

वाचा: युद्ध न करता तालिबान अफगाणिस्तानचा ताबा मिळवणार?; अमेरिकाही चिंतेत



Video अफगाणिस्तान राष्ट्रपती भवनावर रॉकेट डागले; नमाजावेळी झाला हल्ला

सालेह यांचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. हे ट्विट पाच हजारांहून अधिक वेळेस रिट्विट करण्यात आले आहे. या ट्विटनंतर पाकिस्तानी युजर्सचा थयथयाट सुरू झाला. दरम्यान, याआधीही सालेह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला होता. पाकिस्तानी हवाई दलाने तालिबानवर कारवाई न करण्याची धमकी अफगाणिस्तानला दिली असल्याचा खुलासा सालेह यांनी केला होता. याचे जोरदार पडसाद उमटले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज