अ‍ॅपशहर

डब्ल्यूटीओमधून बाहेर पडणार नाही-ट्रम्प

जागतिक व्यापार संघटनेतून (डब्ल्यूटीओ) बाहेर पडण्याचा अमेरिकेचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे...

Maharashtra Times 1 Jul 2018, 4:00 am
वॉशिंग्टन : जागतिक व्यापार संघटनेतून (डब्ल्यूटीओ) बाहेर पडण्याचा अमेरिकेचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. मात्र,'डब्ल्यूटीओ' अमेरिकेला खूप वाईट वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्रम्प यांनी 'डब्ल्यूटीओ'तून बाहेर पडण्याची इच्छा बोलून दाखवल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम america wont get out of wto
डब्ल्यूटीओमधून बाहेर पडणार नाही-ट्रम्प


पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, की चीन जेव्हा 'डब्ल्यूटीओ'त सहभागी झाला तेव्हापासून झालेली त्यांची प्रगती पाहता, आम्हाला अत्यंत वाईट वागणूक दिल्याचे स्पष्ट होते. हे खूप चुकीचे आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक बाबी गमावल्या आहेत. न्यायाधीशांचा विचार करता आम्ही अल्पसंख्याक आहोत. आमच्या आधीच्या अध्यक्षांनी ही स्थिती चालवून घेतली. मात्र, अनेक देशांनी अमेरिकेकडून फक्त फायदाच उपटला आहे. त्यात चीन, कॅनडा, मेक्सिको आदींचा समावेश आहे.

अमेरिकेने कॅनडा आणि चीनमधून येणाऱ्या उत्पादनांवर नुकतेच अधिक कर लावले होते. त्यातून जशास तसे न्यायाने कॅनडा आणि चीननेही अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणांवर सध्या 'डब्ल्यूटीओ'मध्ये चर्चा सुरू असून अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे. दरम्यान, ट्रम्प हे खूप आधीपासूनच 'डब्ल्यूटीओ'च्या विरोधात आहेत. त्याबाबतची नाराजी त्यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज