अ‍ॅपशहर

बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल

अमेरिकन लेखक, गायक, गीतकार बॉब डिलन यांना यंदाच्या वर्षाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नव्या पद्धतीच्या काव्य रचनेसाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. गीतकाराला त्याच्या गीतासाठी नोबेल पुरस्कार देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

Maharashtra Times 13 Oct 2016, 10:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त। स्टॉकहोम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम american songwriter bob dylan wins nobel literature prize
बॉब डिलन यांना साहित्यातील नोबेल


अमेरिकन लेखक, गायक, गीतकार बॉब डिलन यांना यंदाच्या वर्षाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गायनात नव्या पद्धतीच्या काव्य रचनेसाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. गीतकाराला त्याच्या गीतासाठी नोबेल पुरस्कार देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

बॉब डिलन यांनी कॅफे हाऊस, क्लबमध्ये गाणे गात आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. ‘ब्लोविन इन ड विंड' आणि 'दे आर चेंजिंग’ हे त्यांचे गाणे मानवाधिकार संघटना आणि युद्ध विरोधी संघटनांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरले. डिलन यांनी आपल्या गीतामध्ये सामाजिक मुद्यांवरही भाष्य केले आहे. बॉब डिलन यांच्या संगीताची, गीतांची जादू अजून कायम आहे. त्यांच्या ६०च्या दशकातील लोकप्रिय गीतांमधून सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब उमटत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज