अ‍ॅपशहर

आणखी एका मुलीचे अपहरण

दोन हिंदू मुलींचे अपहरण करून धर्मांतर आणि बालविवाह केल्यावरून वाद पेटला असतानाच पाकिस्तानात आणखी एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. अल्पसंख्यांकमंत्री हरी रामकिशोर लाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असल्याचे समजते.

MT 27 Mar 2019, 4:00 am
कराची : दोन हिंदू मुलींचे अपहरण करून धर्मांतर आणि बालविवाह केल्यावरून वाद पेटला असतानाच पाकिस्तानात आणखी एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. अल्पसंख्यांकमंत्री हरी रामकिशोर लाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असल्याचे समजते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम another hindu girl kidnapped in pakistan
आणखी एका मुलीचे अपहरण


अपहरण झालेली मुलगी बदिन जिल्ह्यातील टँगो बघो येथील असून, तिचे वय १६ वर्षे आहे. मेघवर समाजाच्या या मुलीच्या अपहरणाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अर्थात, हे अपहरण कधी झाले याचा तपशील उपलब्ध झालेला नाही. मात्र, पीडित मुलीच्या वडिलांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सरदार हुसैन नैझी यांची भेट घेऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, यापूर्वी अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर व बालविवाह करण्यात आलेल्या रविना (१३) व रीना (१५) या हिंदू मुलींना संरक्षण देण्याचे आदेश मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिले.

हिंदू मुलींना कुटुंबाकडे सोपवा

अपहरण करून धर्मांतर आणि बालविवाह प्रकरणातील दोन हिंदू मुलींची सुटका करून त्यांना लगेचच त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करावे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी पाकिस्तानला बजावले आहे. 'पाकिस्तानात हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर. या मुलींचे वयाचाही विचार नाही. रवीना केवळ १३ वर्षांची आणि रीना १५ वर्षांची आहे. या वयात या दोन्ही मुली स्वत:हून धर्मांतर करतील आणि विवाह करतील यावर नया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान हेही विश्वास ठेवणार नाहीत,' असे ट्विट स्वराज यांनी केले आहे.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज