अ‍ॅपशहर

कझाकिस्तानात १०० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले!

कझाकिस्तानातील अलमाटी शहर आज सकाळी विमान अपघातामुळं हादरलं. अपघातग्रस्त विमानात ९५ प्रवासी व पाच क्रू मेंबर होते. आलमाटी विमानतळानं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra Times 27 Dec 2019, 12:00 pm
अलमाटी: कझाकिस्तानातील अलमाटी शहर आज सकाळी विमान अपघातामुळं हादरलं. अपघातग्रस्त विमानात ९५ प्रवासी व पाच क्रू मेंबर होते. आलमाटी विमानतळानं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे विमान कझाकिस्तानची राजधानी नूर सुलतानच्या दिशेनं निघालं होतं. उड्डाण भरत असतानाच पायलटचं नियंत्रण सुटल्यानं विमान संरक्षक भिंतीवर तोडून एका इमारतीवर जाऊन आदळलं, अशी माहिती कझाकिस्तानच्या नागरी उड्डाण समितीनं दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा कामाला लागल्या असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

वाचा: बुर्ज खलिफा नाही; 'ही' असेल सर्वांत उंच इमारत!

वाचा: फॅनफोन चक्रीवादळाचे फिलिपाइन्समध्ये १६ ठार
वाचा: आशिया-पॅसिफिक भूभागावार हवामान संकट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज