अ‍ॅपशहर

US Shooting: वृत्तपत्राच्या कार्यालयावर गोळीबार

अमेरिकेत अ‍ॅनापोलिस शहरात एका वृत्तपत्राच्या कार्यालयावर एका बंदुकधारीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत तर अनेकजण जखमी आहेत. अ‍ॅनापोलिसहून प्रकाशित होणाऱ्या कॅपिटल गॅजेट वृत्तपत्राचे कार्यालय या इमारतीत आहे. याच कार्यालयात हा गोळीबार झाला आहे. पोलिसांनी या बंदुकधारीला अटक केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jun 2018, 9:10 am
वॉशिंग्टन :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम us-firing

अमेरिकेत अ‍ॅनापोलिस शहरात एका वृत्तपत्राच्या कार्यालयावर एका बंदुकधारीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत तर अनेकजण जखमी आहेत. अ‍ॅनापोलिसहून प्रकाशित होणाऱ्या कॅपिटल गॅजेट वृत्तपत्राचे कार्यालय या इमारतीत आहे. याच कार्यालयात हा गोळीबार झाला आहे. पोलिसांनी या बंदुकधारीला अटक केली आहे.

जॅरॉड वॉरेन रॅमोस (३८) , अशी या बंदुकधारीची ओळख पटली आहे. कॅपिटल गॅझेट वृत्तपत्र आणि त्याच्या एका पत्रकाराविरोधात जॅरॉड याने २०१२ मध्ये कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. हा खटला तो हरला होता. याचा राग काढत त्याने हा गोळीबार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कॅपिटल गॅजेटचे पत्रकार फिल डेव्हिस यांनी टि्वट केलंय की, 'एका बंदुकधारी व्यक्तीने काचेच्या दरवाजाच्या पलीकडून कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेक जण मारले गेले आहेत.' डेव्हिस पुढे असंही लिहीतात की, 'तुम्ही डेस्कखाली आहात आणि लोकांवर गोळ्या झाडल्याचे आणि बंदुक रिलोड करण्याचे आवाज येताहेत. यापेक्षा भयावह काही असू शकत नाही.'

अ‍ॅनापोलिसच्या चार मजली इमारतीत वृत्तपत्राचे कार्यालय आहे. अ‍ॅनापोलिस अमेरिकेतील मेरीलँड राज्याची राजधानी आहे. या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टि्वट केले आहे. ते लिहितात, 'विस्कॉन्सिनला निघण्यापूर्वी मला या गोळीबाराबद्दल माहिती देण्यात आली. या गोळीबारात बळी गेले त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज