अ‍ॅपशहर

अनेकांना नेतृत्वाचे ढोंगही करता येत नाही; ओबामांची टीका

अमेरिकेत करोना संसर्गाच्या आव्हानास सामोरे जाताना आलेले अपयश आणि कृष्णवर्णीय व्यक्तींवर होत असलेल्या हल्ल्यांवरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2020, 7:27 pm
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. करोना संसर्गाबाबतची परिस्थिती हाताळण्यात आलेली परिस्थिती आणि कृष्णवर्णीय नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. अनेक जण प्रमुख असल्याचे ढोंग करूही शकत नाहीत, हे करोना संसर्गात काळामध्ये दिसून आले असल्याचे ओबामा यांनी म्हटले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Barack Obama on trump


महाविद्यालये व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, ओबामा यांनी सध्याचे नेतृत्व या आव्हानामध्ये उघडे पडल्याची टीका केली. अनेक माणसांना वाटते, की ते प्रमुख आहेत आणि ते काय करत आहेत, हे त्यांना माहीत आहे. मात्र, त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे नाहीत,असे त्यांनी म्हटले. ओबामा यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या कार्यकाळातील अधिकारी वर्गाशी संवाद साधला. त्यामध्येही त्यांनी करोना विषाणूची परिस्थिती ही पूर्णपणे गोंधळाची आपत्ती आहे, असे म्हटले होते. करोनाच्या काळामध्ये कृष्णवर्णीय जनतेवर झालेल्या परिणामांचा उल्लेख करताना, या आजाराच्या काळामध्ये या समाजावर असमानता आणि अन्य बोजाही वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 'अनेक जणांना आपण काय करत आहोत, हेही कळत नाही. करोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये या सर्वांचे खरे रूप उघड झाले आहे. या आव्हानानंतर जग पूर्वीपेक्षा जास्त चांगले होणार असेल, तर ती जबाबदारी तुमची असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

वाचा: करोना: स्पेनमध्ये दोन महिन्यानंतर शंभरहून कमी मृतांची नोंद
वाचा: होय...करोना व्हायरसचे सुरुवातीचे नमुने नष्ट केले: चीन

अन्य नागरिकांच्या तुलनेत आफ्रिकी-अमेरिकी नागरिकांची संख्या व्यस्त असल्याचा संदर्भ ओबामा यांच्या या विधानामागे आहे. ओबामा हे सामान्यपणे कमी बोलणारे राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात ट्रम्प आणि ओबामा यांच्यात सोशल मीडियावरही चकमक झडली आहे. करोना संसर्गाचा जगात अमेरिकेला सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या ८८ हजारांच्या पुढे गेली आहे, तर रुग्णांची संख्या १४ लाख ६० हजारांवर गेली आहे.

आणखी वाचा:
‘रेड लाइट’ परिसर बंद ठेवल्यास नवीन रुग्ण संख्येत ७२ टक्क्यांनी घट!
करोना संसर्गाचा मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम!
चक्क पंतप्रधानांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज