अ‍ॅपशहर

​ बराक ओबामांची कूटनीती

​ बराक ओबामा शुक्रवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आणि नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारला. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी, आपण ओबामा यांचे सर्व निर्णय बदलणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, ओबामा यांनी काळाची पावले ओळखून जाता जाता काही कूटनिर्णय घेतले. ट्रम्प यांना सहजासहजी हे निर्णय बदलता येणार नाहीत. त्याची ही नोंद...

Maharashtra Times 21 Jan 2017, 6:52 am
बराक ओबामा शुक्रवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आणि नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारला. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी, आपण ओबामा यांचे सर्व निर्णय बदलणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, ओबामा यांनी काळाची पावले ओळखून जाता जाता काही कूटनिर्णय घेतले. ट्रम्प यांना सहजासहजी हे निर्णय बदलता येणार नाहीत. त्याची ही नोंद...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम barack obama policy
​ बराक ओबामांची कूटनीती


रशियावर निर्बंध

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी रशियाने अमेरिकेच्या यंत्रणेवर सायबर हल्ले चढवून हॅकिंग केल्याचा, तसेच ट्रम्प यांच्या विजयाला रशियाने हातभार लावल्याचा आरोप ओबामा यांनी केला. निवडणुकीची ही पार्श्वभूमी, सन २०१४मधील युक्रेन, तसेच सीरियामधील युद्ध आणि ट्रम्प यांची रशियाबरोबरची जवळीक पाहून ओबामा यांनी रशियावर निर्बंध घातले. ते उठवण्यासाठी ट्रम्प यांना दीर्घकालीन संसदीय लढाई लढावी लागेल.

क्युबाशी मैत्रीची ‘भिंत’

कार्यकाळाच्या अखेरच्या वेळी क्युबाच्या नागरिकांसाठी अमेरिकेत दोन दशकांपासून अस्तित्वात असलेले ‘वेट फूट ड्राय फूट’ हे धोरण रद्द केले. याअंतर्गत अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेल्या क्युबाच्या नागरिकांना एक वर्ष वास्तव्यानंतर अमेरिकेत कायमस्वरूपी राहता येत होते. क्युबाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि आपले इमिग्रेशन धोरण अधिक काटेकोर करण्यासाठी ओबामा यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. क्युबाविरोधी ट्रम्प यांना ओबामा यांनी दिलेला हा शह आहे.

इराणशी अणु सहकार्य

अमेरिका-इराण अणुकरार हा ओबामा यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाचा निर्णय मानला जातो. या कराराला अंतिम रूप देण्यासाठी जगातील सहा महासत्ता एकत्र आल्या. विशेष म्हणजे, रिपब्लिकन पक्षाचा विरोध असतानाही, अमेरिकन काँग्रेसने त्यास मंजुरी दिली. या करारामुळे इराणला अण्वस्त्र विकसित करण्यापासून रोखण्यात आले. इराणविरोधी ट्रम्प यांनी हा करार रद्द केल्यास उभय देशांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

ओबामाकेअर

अमेरिकेतील सर्व नागरिकांसाठी आरोग्यविम्यासंदर्भातील बराक ओबामा यांच्या योजनेला ओबामाकेअर असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकत आरोग्यसेवांवर केल्या जाणाऱ्या खर्चांमध्ये कपात करणे, तसेच कमी किमतीत अधिक आरोग्य सेवा उपलब्ध करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहेत. मात्र, ही योजनाही अत्यंत वाईट असून, ती बंद करून बदलण्यात येणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. मात्र या योजनेला अमेरिकी नागरिकांचा असलेला पाठिंबा हेच ट्रम्प यांच्यासमोर आव्हान असेल.

मुस्लिम नोंदणी कार्यक्रम रद्द

९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या मुस्लिमांची नोंदणी सुरू करण्यात आली होती. मात्र, ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर लगेचच मुस्लिमांच्या अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्यात येईल, असे वक्तव्य केल्यानंतर ओबामा यांनी हा नोंदणी कार्यक्रमच बंद केला. याला ‘नॅशनल सिक्युरिटी एन्ट्री-एक्झिट रजिस्ट्रेशन सिस्टीम’ असे म्हटले जात होते. ट्रम्प यांना मुस्लिमांविरोधात निर्बंध घालायचे असतील तर त्यासाठी नोटिफिकेशन मंजूर करावे लागेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज