अ‍ॅपशहर

व्हिडीओ पाहून पक्षी शिकले खाद्यान्न टाळणे!

काही पक्षांकडे बेचव आणि विषारी ठरू शकणारे खाद्यन्न टाळण्यासाठी शिकण्याची नैसर्गिक क्षमता चक्क एकमेकांचे खाण्याचे व्हिडीओ बघून विकसीत होऊ शकते, अशा प्रकारचे संशोधन नव्याने समोर आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2020, 12:13 pm
लंडन: काही पक्षांकडे बेचव आणि विषारी ठरू शकणारे खाद्यन्न टाळण्यासाठी शिकण्याची नैसर्गिक क्षमता चक्क एकमेकांचे खाण्याचे व्हिडीओ बघून विकसीत होऊ शकते, अशा प्रकारचे संशोधन नव्याने समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Blue-tit-bird


इतर पक्षांचे नापसंतीचा प्रतिसाद बघून ब्लू टिट्स आणि ग्रेट टिट्स हे युरोपातील पक्षी भक्ष्याची चव घेतल्याशिवाय त्याबद्दल ठरवू शकतात, असे जर्नल ऑफ अॅनिमल इकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे.

केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार पक्षी आणि त्यांच्या भक्ष्यांचे आयुर्मान यामुळे वाढू शकेल. ब्ल्यू टिट्स त्यांच्या स्वत:च्या प्रजातीकडून तर ग्रेट टिट्सने ग्रेट आणि ब्ल्यू टिट्सचे निरीक्षण करून ही क्षमता विकसीत केली. हे पक्षी केवळ निरीक्षणातून कोणते खाद्य त्यांच्यासाठी योग्य राहील हे ठरवू शकले. लेडीबर्ड, फायरबग, टायगर मॉथ हे पक्षांचे खाद्य आहेत. त्यांच्या शरीरात कडवट चव असलेली रसायने असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या उपाययोजनांमधून त्यांचे संरक्षण होऊ शकते.

या संशोधनात प्रत्येक पक्षाला दुसऱ्या पक्षाचा व्हिडीओ दाखवला गेला. भक्ष्य पकडताना त्या पक्षाची प्रतिक्रिया पाहून हे पक्षी तशा प्रकारचे भक्ष्य चव न घेताच टाळू लागले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज