अ‍ॅपशहर

Coronavirus vaccine आम्हीही फ्रंटलाईन वर्कर; लशीच्या मागणीसाठी देहविक्री करणाऱ्या महिलांचा संप

Coronavirus updates: करोना लसीकरणात समावेश करण्याच्या मागणीसाठी ब्राझीलमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. करोना काळात या महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2021, 1:24 pm
ब्राझीलिया: जगभरात करोनाचे थैमान सुरू आहे. अनेक देशांमध्ये करोनाच्या संसर्गाची पुन्हा एकदा लाट आली असून अर्थचक्र थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरण सुरू आहे. करोना लस देण्याच्या मागणीसाठी ब्राझीलमधील एका शहरात देहविक्री करणाऱ्या महिलांनी आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम brazil-prostitue-strike
करोना लशीसाठी देहविक्री करणाऱ्या महिलांचे आंदोलन


ब्राझीलमधील दक्षिणपूर्व शहर बेलो होरिजोंटेमधील देहविक्री करणाऱ्या महिलांनी एक आठवड्यांचे धरणे आंदोलन सुरू केले असून संपावर गेल्या आहेत. करोना लशीच्या लाभार्थ्यांच्या यादीत त्याचाही समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आम्हीही फ्रंटलाईन कर्मचारी असून लसीकरणात आमचाही समावेश करावी अशी मागणी त्यांनी केली. करोना महासाथीच्या काळात या महिलांना मोठ्या त्रासातून जावे लागले.

वाचा: बायडन यांची मोठी घोषणा; अमेरिकेत १९ एप्रिलपासून सर्वांना करोना लस

करोना महासाथीच्या काळात अनेक हॉटेल बंद करण्यात आले होते. त्यामुळे देहविक्री करणाऱ्या अनेक महिलांना उपजीविकेच्या साधना काही घरे भाडे तत्वावर घ्यावी लागली होती. मिनास गॅरेस राज्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या संघटनेच्या अध्यक्षा सीडा विएरा यांनी सांगितले की, आम्ही फ्रंटलाइन कर्मचारी आहोत आणि आम्हीदेखील अर्थव्यवस्थेचा एक भाग आहोत. आम्हालादेखील करोनाची घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: होय, एस्ट्राजेनकाच्या करोना लशीमुळे मेंदूत रक्ताची गाठ, पण...

वाचा: भारतात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; 'या' कारणामुळे जगाला चिंता

महासाथीच्या आजारामुळे बंद करण्यात आलेल्या हॉटेलजवळही धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की, आम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येतो. त्यामुळे आम्हाला लशीची आवश्यकता आहे. सध्या आरोग्य कर्मचारी, शिक्षक, वयस्कर आणि आजारी असलेल्यांना करोना लस देण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज