अ‍ॅपशहर

मच्छिमाराच्या जाळ्यात फसली 'मायावी' गोल्ड फिश, २० वर्षांपासून होती सरोवराच्या तळाशी

British Man Catch Gold Fish: फ्रान्समधील एका ब्रिटिश नागरिकाला मासेमारी करताना जगातील सर्वात मोठी गोल्ड फिश सापडली आहे. या माशाचे वजन जवळपास ३० किलो आहे.

Authored byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2022, 9:21 am
पॅरीसः फ्रान्समधील एका ब्रिटिश नागरिकाला मासेमारी करताना जगातील सर्वात मोठी गोल्ड फिश सापडली आहे. या माशाचे वजन जवळपास ३० किलो आहे. या माशाचा रंग नारंगी असल्याकारणाने मच्छिमाराने तिचं नाव कॅरेट असं ठेवलं आहे. गोल्ड फिशचा विशाल आकार पाहता सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Untitled design


मच्छिमाराच्या जाळ्यात सापडलेली गोल्डफिश लेदर कार्प आणि कार्प यांची हायब्रिड प्रजाती आहे. तिचं वजन जवळपास ३० किलो असून तिचं वय २० वर्ष आहे. ब्रिटनच्या जेनल काउलर यांनी एका सरोवरात तिला सोडलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मशाला पकडण्याचे प्रयत्न होत होते. खूप क्वचित वेळी ती पाण्यातून बाहेर दिसत होती. ४२ वर्षीय एंगलर एंडी हैकेट यांनी जेव्हा पाण्यात गळ टाकला तेव्हा लगेचच २५ मिनिटांनंतर त्यांच्या हाती हा विशालकाय मासा लागला.

वाचाः ज्याच्या लग्नाचं आमंत्रण, त्याच्याच अंत्यविधीला जाण्याची वेळ, २६ वर्षीय नवरदेवाचा करुण अंत

२०१०मध्ये फ्रान्समधील दक्षिण भागात हा मासा दिसला होता. तेव्हा त्याचे वजन १३ किलोग्रॅम होते. एंडी हैकेट यांनी शैम्पेन ब्लूवॉटर सरोवरात हा मासा सापडला आहे. हैकेट यांनी पुन्हा गोल्ड फिशला पाण्यात सोडलं आहे. ते म्हणतात, मला आधीपासूनच माहिती होतं की या सरोवरात कॅरेट आहे. मात्र, मला अजिबात खात्री नव्हती की ती माझ्या जाळ्यात सापडेल. हा मासा आकाराने खूप मोठा आहे हे मला माहिती होतं. कारण जाळ्यात अकडल्यानंतर ती सुटकेचा प्रय़त्न करताना जाळं खेचत होती. त्यानंतर पाण्यावर मला नारंगी रंगाचा मासा दिसला. या माशाला पकडणं हा माझा आजवरचा सगळ्यात चांगला अनुभव होता.

वाचाः एकनाथ शिंदे देवदर्शनाला, उद्धव ठाकरे जनतेच्या दरबारात; महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हायव्होल्टेज दिवस
एंडी यांनी गोल्ड फिश पकडल्यानंतर तिच्यासोबत फोटो काढले, व नंतर पुन्हा पाण्यात सोडलं. तसंच, गोल्ड फिश पकडल्याचा आनंद त्यांनी एक कप चहा घेऊन साजरा केला.

आम्ही जवळपास २० वर्षांपूर्वी कॅरेटला या सरोवरात सोडलं होतं. जेणेककरुन मासेमारी करणाऱ्यांना चांगला अनुभव मिळेल. मात्र, ही गोल्ड फिश प्रचंड मायावी आहे. ती क्वचितच सरोवराच्या किनाऱ्यावर वा पृष्ठभागावर दिसते. तर, कधी-कधी दिसतच नाही. तिचं आरोग्यही उत्तम आहे, असं सरोवराचे प्रबंधक जेसन काऊलर यांनी म्हटलं आहे.

वाचाः मुंबईकर प्रवाशांनो... रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या देखभाल-दुरुस्ती; पाहा कुठे आहे मेगाब्लॉक
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख