अ‍ॅपशहर

दहशतवाद्यांनी मुलीला ठार केलं, पत्नीवर बलात्कार

तालिबानशी संबंधीत हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी कॅनडाच्या एका नागरिकाचे अपहरण करून त्याच्या मुलीला ठार केल्याची आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Maharashtra Times 14 Oct 2017, 2:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । टोरँटो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम canadian ex hostage says extremists killed child raped wife
दहशतवाद्यांनी मुलीला ठार केलं, पत्नीवर बलात्कार


तालिबानशी संबंधीत हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी कॅनडाच्या एका नागरिकाचे अपहरण करून त्याच्या मुलीला ठार केल्याची आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जोशुआ बोयले असं या कॅनडाच्या नागरिकाचं नाव आहे. बोयले हा त्याच्या पत्नी आणि तीन मुलांसह पाच वर्ष दहशतवाद्यांच्या कैदेत होते. पाच वर्षानंतर या कैद्यांच्या तावडीतून सुटल्यावर त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली. त्यांना हक्कानी नेटवर्कच्या अतिरेक्यांनी पकडले तेव्हा त्याची पत्नी कॅटलान कोलमन गर्भवती होती. त्यांच्या या चौथ्या मुलाबद्दल कुणालाही माहिती नव्हती. त्याच्या पत्नीवर एका सुरक्षा रक्षकाने बलात्कार केला. त्याला त्याचे सहकारी आणि मालक उत्तेजन देत होता, असं त्यांनी सांगितलं.

अफगाणिस्तान- तालिबानच्या नियंत्रण क्षेत्रात कोणतीही एनजीओ पोहचू शकली नाही. तिथे सरकारी मदतही पोहचत नव्हती, अशा गावात बोयले २०१२ मध्ये गेले होते. त्यावेळी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. पाच वर्षानंतर पाकिस्तानच्या जवानांनी त्यांची सुटका केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज