अ‍ॅपशहर

लडाखमधील वादाची माहिती नाहीः चीन

लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरून भारतीय क्षेत्रात पीएलएच्या सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती नाही, असा दावा चीनने केला आहे. तसंच सीमेवर शांतता ठेवण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असं चीनने म्हटलंय.

Maharashtra Times 16 Aug 2017, 6:24 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पेइचिंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम china claims unaware of scuffle between pla indian troops in ladakh
लडाखमधील वादाची माहिती नाहीः चीन


लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरून भारतीय क्षेत्रात पीएलएच्या सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती नाही, असा दावा चीनने केला आहे. तसंच सीमेवर शांतता ठेवण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असं चीनने म्हटलंय.

चिनी सैनिकांनी १५ ऑगस्टच्या सकाळी लडाखच्या पँगाँग तलवाच्या भागात भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना पिटाळून लावत हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर चिनी सैनिकांनी दगडफेक केली. त्याला भारतीय जवानांनीही दगडफेक करत प्रत्युतर दिलं. या घटनेत दोन जवान किरकोळ जखमी झाले.

'लडाखमधील घटनेची आम्हाला माहिती. पण पिपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)चे जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कायम गस्त घालत असतात. भारत-चीन सीमेवर शांतता राखण्यासाठी चीन कटीबद्ध आहे. तसंच भारतानेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत आणि दोन्ही देशांनी केलेल्या करारांचं पालन करावं', असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हु चुनयिंग यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज