अ‍ॅपशहर

उड्डाण घेताना विमानाला भीषण आग; चीनमध्ये ११३ प्रवासी थोडक्यात बचावले

आग दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यात आली.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2022, 9:33 am
बीजिंग : चीनच्या चाँगकिंग शहरात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील विमानतळावर तिबेट एअरलाइनच्या विमानाला भीषण आग लागली. उड्डाण घेताना विमान घसरल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात ११३ प्रवासी आणि इतर नऊ कर्मचारी होते. आगीची माहिती मिळताच या सर्वांना विमानातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. (Plane Fire News)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम china plane fire
चीनमध्ये विमानाला भीषण आग


मिळालेल्या माहितीनुसार, तिबेट एअरलाइनचे विमान चाँगकिंग शहरातून न्यिंगची येथे जात होते. मात्र उड्डाण घेताना रनवेवर विमान घसरले आणि आग लागली. विमानाने उड्डाण घेतलं नसल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. यामध्ये काही प्रवाशांना किरकोळ जखम झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विमानाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यात आली.

सप्टेंबरमध्ये निवडणुकांचा प्रस्ताव,मंत्रिमंडळ बैठकीत भुजबळ निवडणूक आयोगाच्या कारभारावर संतापले

दरम्यान, चीनमध्ये दोन महिन्यांपूर्वीही अशी एक दुर्घटना घडली होती. चीनच्या इस्टर्न एअरलाइन्सचा विमानाला अपघात होऊन १३२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज