अ‍ॅपशहर

शी यांचा निवडणुकीपूर्वी भारत दौरा नाही

भारतात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी तेथे भेट देण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे चीनने बुधवारी म्हटले आहे. जपानमधील निकेई एशियन रिव्ह्यू या माध्यमाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. अमेरिकेबरोबरचा राजनैतिक संघर्ष तीव्र होत असल्याने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे फेब्रुवारीत भारताला भेट देणार असल्याचे त्यात म्हटले होते.

PTI 24 Jan 2019, 2:30 am
बीजिंग : भारतात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी तेथे भेट देण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे चीनने बुधवारी म्हटले आहे. जपानमधील निकेई एशियन रिव्ह्यू या माध्यमाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chinese president xi jinping visit india no proposal before elections
शी यांचा निवडणुकीपूर्वी भारत दौरा नाही


अमेरिकेबरोबरचा राजनैतिक संघर्ष तीव्र होत असल्याने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे फेब्रुवारीत भारताला भेट देणार असल्याचे त्यात म्हटले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना चीनच्या अधिकृत सूत्रांनी या वृत्ताचा इन्कार केला. निवडणुकीपूर्वी भारताला भेट देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. निवडणूक झाल्यानंतर आणि तेथे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर शी हे भारताला भेट देऊ शकतील, असे सू्त्रांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज