अ‍ॅपशहर

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कापडी मास्क अधिक उपयुक्त!

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला तज्ञांनी याआधीच दिला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यासाठी कापडी मास्क अधिक उपयुक्त असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2020, 11:00 am
टोरंटो : सुती कापडाचे अनेक थर असलेले कापड किंवा मास्क करोनाचा प्रादुर्भाव रोखू शकते, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठातील अभ्यासकांनी हे संशोधन केले आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कापडी मास्क करोनाला रोखू शकतो


बहुतेक विषाणूंचा संसर्ग हा थेंबांसारख्या मोठ्या स्रावांद्वारे होतो. तो शिंक किंवा खोकल्यातून पसरतो, असे संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे तीन थरांचा सुती कापडाचा मास्क करोनाच्या विषाणूच्या संसर्गापासून जवळपास ९९ टक्के बचाव करू शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. करोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या देशांमध्ये मास्क अनिर्वाय करण्यात आले आहे.

वाचा: करोना चाचणीची लस घेतली आणि बेशुद्ध पडला!

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सगळेच सध्या सुरक्षित अंतराचा नियम पाळतात. मात्र, सध्या तरी एकमेकांमधील फक्त सहा फुटांचे अंतर पाळणे पुरेसे नसल्याचा दावा कॅलिफोर्निया विद्यापीठातील अभ्यासकांनी केला आहे. तापमान कमी आणि दमटपणा जास्त असेल, तर विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. मात्र, तापमान जास्त आणि दमटपणा कमी असणे हे लहान 'एरोसोल कण' तयार होण्यासाठी पोषक वातावरण आहे. उष्ण आणि कोरड्या हवामानात तर संसर्गाची शक्यता सर्वांत मोठी आहे. विविध प्रकारच्या वातावरणानुसार करोनाच्या विषाणूचा संसर्ग जवळपास १९.७ फुटांपर्यंतही होऊ शकतो; म्हणूनच 'सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन'ने (सीडीसी) सांगितलेले सहा फूट अंतर पाळण्याचे निकष पुरेसे नसल्याचे संशोधकांचे मत आहे.

आणखी वाचा:
चीनच्या जागतिक दादागिरीचं गुपित काय आहे? हे पाहाच!
करोना: भारताच्या शेजारच्या 'या' देशात एकही मृत्यू नाही

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज