वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अलाहाबाद हायकोर्टातील न्यायमूर्ती विक्रम नाथ यांची आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्याची सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने नाकारली असून, या शिफारशीचा फेरविचार करावा अशी सूचना केली आहे. शिफारस परत पाठविण्याचे कोणतेही कारण सरकारने दिलेली नाही. आठ एप्रिल रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून विक्रम नाथ यांच्या नावाची शिफारस केली होती. 'न्यायमूर्ती नाथ हे अलाहाबाद हायकोर्टातील वरिष्ठ न्यायमूर्ती असून, त्यांच्याशी संबंधित बाबींचा विचार करता त्यांची आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करावी,' अशी शिफारस कॉलेजियमने केली होती.