अ‍ॅपशहर

पाकिस्तानमध्ये आढळले करोनाचे दोन रुग्ण

पाकिस्तानमध्ये करोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा शेजारील देश असणाऱ्या इराणमध्ये सध्या करोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यानंतर आता पाकिस्तानमध्येही करोना व्हायरसने प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2020, 5:50 pm
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये करोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा शेजारील देश असणाऱ्या इराणमध्ये सध्या करोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यानंतर आता पाकिस्तानमध्येही करोना व्हायरसने प्रवेश केला आहे. करोना संसर्गावर उपाययोजना म्हणून पाकिस्तान-इराण दरम्यानची विमान वाहतूक बंद केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona-virus-Pakistan


दक्षिण आशियात चीन आणि इरानमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे. बुधवारी, पाकिस्तानमध्ये करोनाचे दोन रुग्ण आढळले. हे दोन्ही रुग्ण नुकतेच इराणहून परतले होते. यातील एक जण सिंध प्रांतातील असून दुसरा रुग्ण राजधानी इस्लामाबाद येथील आहे. तर, १५ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

वाचा: करोनाचे जगात थैमान! ४८ देशांमध्ये संसर्ग

करोनाची भीती; शाळांना सुट्टी

करोना व्हायरसच्या संसर्गाचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय आखण्यात येत आहे. बलुचिस्तान आणि सिंधमध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सिंध प्रांताचे राज्यमंत्री सय्यद गनी यांनी २७ व २८ फेब्रुवारी रोदी राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर, बलुचिस्तान प्रांतात १५ मार्चपर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, चीनमध्ये करोनाच्या नव्या रुग्णात घट होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढत आहे. हुबेई प्रांत वगळता इतर प्रांतातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चीनचा शेजारचा देश दक्षिण कोरियात करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा:
काश्मीर मुद्दा: भारताने पाकिस्तानला सुनावले
दिल्ली हिंसाचार: इम्रान खान यांचा इशारा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज