अ‍ॅपशहर

इटली विमानतळावर भारतीय विद्यार्थी अडकले

जगभरात चीन नंतर इटलीत करोना संसर्गाची अधिक लागण झाली आहे. इटलीतून मायदेशी परतणारे भारतीय विद्यार्थी एका प्रमाणपत्राच्या अभावी विमानतळावर अडकले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2020, 5:22 pm

वाचा: चीननं दिली मोठी खूशखबर; खतरनाक 'करोना' आटोक्यात

रोम: करोना विषाणूच्या फैलावाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशात परदेशी नागरिकांना विमानतळावरच थांबवण्यात आले आहे. भारतातून इटलीला गेलेले पर्यटकही विमानतळावर अडकले आहेत. तर रोम आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय विद्यार्थी अडकले असून मायदेशी परतण्याची आस या विद्यार्थ्यांना लागली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian students


करोना संसर्गाच्या भीतीमुळे बरीच काळजी घेतली जात आहे. करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता जारी करण्यात आलेल्या निर्देशाचे पालन एअर इंडियाकडून करण्यात येत असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. संबंधित प्रवाशाला करोनाची बाधा नसल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय विमानातून प्रवास करू दिला जात नाही. या प्रमाणपत्रा शिवाय एकाही प्रवाशाला विमानात बसू दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या इटलीत मोठ्या प्रमाणावर करोनाचा संसर्ग पसरला आहे. त्यामुळे बहुतांशी डॉक्टर या रुग्णांच्या उपचारात व्यस्त आहेत. त्याच्या परिणामी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.

वाचा: जर्मनीत ७० टक्केजणांना करोनाचा धोका: मर्केल

इटलीमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी हैदराबादच्या अमजेद उल्ला खान या सामाजिक कार्यकर्त्यास संपर्क साधत मदतीची विनंती केली आहे. परराष्ट्र मंत्रालयात या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली आहे. इटलीमधील भारतीय दूतावासाकडून या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इटलीत एअर इंडियाने आपली सर्व उड्डाणे २८ मार्चपर्यंत रद्द केली आहेत. केंद्र सरकारनेही करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा:
करोना: वुहानमध्ये काही कंपन्या सुरू होणार
गो करोना गो: आजारावर 'तिने' केली मात
करोना व्हायरस: दोघांना मस्करी पडली महागात

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज