अ‍ॅपशहर

करोना: 'हा' देश करणार १० हजार कैद्यांची सुटका

जगभरात करोनाचा संसर्ग वाढला आहे. अनेक देशांकडून करोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इराण आता तुरुंगातील कैद्यांची सुटका करणार आहे. यामध्ये राजकीय कैद्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2020, 4:49 pm
तेहरान: करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. चीन, इटलीनंतर सर्वाधिक करोनाचे रुग्ण असलेल्या इराणमध्येही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आता इराणने आपल्या तुरुंगातील १० हजार कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राजकीय कैद्याचाही समावेश असल्याची चर्च आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Iran-jail


इराणमध्ये आतापर्यंत १७ हजार ३६१ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, ११३५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये इराणमध्ये १२०० हून करोनाची रुग्ण आढळली आहेत. करोना संसर्गाची ही परिस्थिती लक्षात घेता इराणने आता १० हजार कैद्यांची कायम सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. या कैद्यांवरील खटले, शिक्षा रद्द करण्यात येणार आहेत. इराणच्या शासकीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणी नवीन वर्षांच्यानिमित्ताने या निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या प्रकरणातील कैद्यांची सुटका करण्यात येणार याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, यामध्ये राजकीय कैद्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. ज्या राजकीय कैद्यांची शिक्षा पाच वर्षांपेक्षा कमी राहिली आहे. अशा कैद्यांना सोडण्यात येणार आहे.

वाचा: करोना...करोना म्हणत एका भारतीयाला मारहाण
वाचा: करोना: इटलीमध्ये मृत्यूचे थैमान; 'ही' आहेत कारणे!

इराण सरकारने याआधीच ८५ हजार कैद्यांची सुटका करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यापैकीच हे १० हजार कैदी आहेत. जाहीर करण्यात आलेल्या ८५ हजार कैद्यांना पुन्हा तुरुंगात यावे लागणार होते. मात्र, त्यातून या १० हजार कैद्यांना वगळण्यात आले आहे.

आणखी वाचा:
करोना: इटलीत एकाच दिवसांत ४७५ जणांचा बळी
'या' रक्तगटाला करोना संसर्गाचा अधिक धोका?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज