अ‍ॅपशहर

Coronavirus Vaccine कॅन्सर उपचारावर सुरू होते संशोधन, विकसित केली करोनाची लस

Coronavirus vaccine news : करोनाला मात देणारी लस विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. करोनावर प्रभावी ठरणारी लस एका शास्त्रज्ञ जोडप्याने विकसित केली असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2020, 12:37 pm
न्यूयॉर्क: करोनाचे थैमान संपूर्ण जगभरात सुरू असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे अंतरीम निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. अमेरिकेतील औषध कंपनी फायजरने विकसित केलेली लस ९० टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे. ही लस विकसित करण्यामागे शास्त्रज्ञ जोडप्यांचा मोठा वाटा आहे. फायजरने करोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona vaccine success story
कॅन्सरवर उपचारावर सुरू होते संशोधन, विकसित केली करोनाची लस


डॉ. ओझलेम ट्यूरेसी (वय ५३) आणि त्यांचे पती डॉ. उगर साहीन (वय ५५) हे दोघेही बायोएनटेक कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी एक स्टार्टअप कंपनी आहे. कॅन्सरवरील उपचाराबाबत संशोधन सुरू असताना करोनाची साथ पसरण्यास सुरुवात झाली होती. कॅन्सरच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी पद्धत त्यांनी करोनाच्या आजारासाठी वापरण्याचे ठरवले आणि त्यादृष्टीने संशोधन सुरू केले.

वाचा: रशियाने जाहीर केली लशीची किंमत; 'इतक्या' रुपयांना मिळणार लस!

जानेवारी महिन्यात वुहानमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावण्यास सुरुवात झाली. एका वैद्यकीय नियतकालिकेमध्ये करोना विषाणूबाबत प्रसिद्ध झालेले संशोधन वाचल्यानंतर त्यांना याचा धोका लक्षात आला. जर्मनीतही करोनाबाधित आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांनी करोना लशीवर काम करण्यास सुरुवात केली होती, असे फायनान्शियल टाईम्सने म्हटले.

वाचा: चीन: शांघायसह तीन शहरात करोनाबाधित आढळले; लाखोजणांची चाचणी सुरू
या शास्त्रज्ञ जोडप्यांनी कर्करोगाला मात देण्यासाठी आरएनएचा (एमआरएनए) वापर करण्याबाबत संशोधन सुरू केले होते. हीच पद्धत त्यांनी करोनावरील उपचारासाठी वापरण्याचे ठरवले. लस विकसित करण्यासाठी या शास्त्रज्ञ जोडप्यांच्या बायोएनटेक कंपनीने फायजरसोबत भागिदारी केली. फायजरमुळे त्यांना लस संशोधनासाठी निधीही उपलब्ध झाला.

वाचा: प्रतिक्षा संपली! अमेरिकेत 'या' तारखेपासून लस देण्यास होणार सुरुवात

यशाचे सेलिब्रेशन

शास्त्रज्ञ डॉ. ओझलेम ट्यूरेसी आणि त्यांचे पती डॉ. उगर साहीन हे दोघेही मुळचे तुर्कस्तानचे आहेत. करोनावरील लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे समजताच वेगळ्या पद्धतीने त्यांनी सेलिब्रेशन केले. या शास्त्रज्ञ जोडप्यांनी तुर्कीश चहा पिऊन आपल्या यशाचा आनंद साजरा केला.

डॉ. उगर साहीन आणि डॉ. ओझलेम ट्यूरेसी यांनी २००८ मध्ये बायोएनटेक कंपनीची स्थापना केली होती. फायजरसह करोना लशीवर संशोधन सुरू असताना त्यांच्या कंपनीच्या शेअरचे दर चांगलेच वधारले. मात्र, शेअरच्या वाढलेल्या किंमतीऐवजी आमचे लक्ष सध्या लशीवर लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज