अ‍ॅपशहर

करोना: अखेर चीनने जगासमोर आणली आपली पहिली लस!

​Chinese coronavirus vaccines Updates:चीनने सगळ्या जगासमोर आपली पहिली करोना लस जाहीर केली. ही लस बीजिंग ट्रेड फेअरमध्ये प्रदर्शित करण्यात आली. करोनावरील लस पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2020, 7:18 pm
बीजिंग: करोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करणाऱ्या लशीची सगळ्या जगाला प्रतिक्षा आहे. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. अशातच चीनने आता आपली करोनावरील लस सगळ्या जगासमोर आणली आहे. ही लस चीनमधील सिनोवॅक बायोटेक आणि सिनोफार्म या कंपन्यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम CHINA SHOWS OFF COVID-19 VACCINES
करोना: अखेर चीनने जगासमोर आणली आपली पहिली लस!


सिनोवॅक बायोटेक आणि सिनोफार्म यांनी विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप सुरू आहे. या लशीची सर्व टप्प्यातील चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर बाजारात लस उपलब्ध होणार आहे. या वर्षाखेरपर्यंत लस उपलब्ध होणार असल्याची दाट शक्यता आहे. सिनोवॅक कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या लशीच्या उत्पादनासाठी एक कारखाना तयार ठेवण्यात आला आहे. या कारखान्यात दरवर्षी ३०० दशलक्ष डोस निर्मिती करण्याची क्षमता आहे. सोमवारी चीनने ही लस बीजिंग ट्रेड फेअरमध्ये प्रदर्शित केली. या लशीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

वाचा: मस्तच...रशियन लस 'या' दिवसांपासून सामान्यांना उपलब्ध होणार!

जगभरात जवळपास १० लशींची चाचणी ही क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. या १० लशींमध्ये चीनच्या या लशीचाही समावेश आहे. करोनाच्या संसर्गाशी जगभरातील सर्वच देश दोन हात करत आहेत. करोनामुळे अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे संसर्गाला अटकाव करणारी लस लवकरात लवकर विकसित व्हावी यासाठी सगळेच देश प्रयत्न करत आहेत.

वाचा: करोना: पाकिस्तानसह चार देशांमध्ये होणार चीनच्या लशीची चाचणी

करोनाच्या संसर्गाला चीनला जबाबदार ठरवण्यात येत आहे. चीननेच करोना विषाणूची निर्मिती केली असल्याचा आरोप अमेरिकेसह इतर देशांनी केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर लस विकसित करून चीन जगाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने एक महिन्याआधीच काही नागरिकांना ही लस दिली होती. चीनमध्ये २२ जुलैपासून काही नागरिकांना लस देण्यात असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली. या लशीचा कोणताही साइड इफेक्ट झाला नसल्याचा दावा चीनच्या आरोग्य विभागाने केला आहे.

वाचा: करोना: कोणतीही लस ५० टक्केही प्रभावी नाही; WHO ने सांगितले 'हे' कारण!
दरम्यान, चीनमधील कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीची चाचणी पाकिस्तानसह चार देशांमध्ये होणार आहे. चायना नॅशनल बायोटेक ग्रुप (सीएनबीजी) आणि सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेड यांनी तयार केलेल्या करोना विषाणूवरील लशींची मानवी चाचणी पाकिस्तानसह इतर चार देशांमध्ये होणार आहे. सध्या लस स्पर्धेत चीन आणि ब्रिटनची ऑक्सफर्डने विकसित केलेली लस आघाडीवर आहे.

वाचा: चांगली बातमी! चाचणीत रशियाची करोना लस ठरली प्रभावी आणि सुरक्षित

सर्बिया आणि पाकिस्तान यांच्यासह तुर्की आणि बांगलादेशने तयारी दर्शवली आहे. आणखी काही देश चाचणीत सहभागी होण्याची शक्यता आहे. चीनमधील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने त्यांच्या लशीची चाचणी देशवासीयांवर करणे अवघड होत आहे. त्यामुळे चिनी कंपन्या इतर देशांकडून चाचणीसाठी माहिती मागवित आहेत. त्याला आता आणखी चार देशांनी प्रतिसाद दिला आहे. 'सीएनबीजी'च्या दोन नमुन्यांची आणि 'सिनोव्हॅक'च्या एका नमुन्याची चाचणी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसारख्या ठरावीक समूहावर करण्यास चीनने परवानगी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज