अ‍ॅपशहर

अमेरिका: शाळा सुरू होताच मुलांना करोनाची लागण!; सात लाखांहून अधिक बाधित

अमेरिकेत करोना महासाथीच्या काळात शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या अंगलट येण्याची भीती आहे. शाळा सुरू झाल्यानंतर करोनाबाधित लहान मुलांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2021, 11:35 am
वॉशिंग्टन: करोना महासाथीच्या आजाराचे थैमान सुरू असताना काही देशांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेत शाळा सुरू होताच करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषत: बाधितांमधील लहान मुलांची संख्या वाढली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास अडीच लाख मुलांना करोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम US-school reopen
संग्रहित छायाचित्र


अमेरिकन अॅकेडमी ऑफ पीडियाट्रिक्सने एका अहवालात म्हटले की, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अडीच लाखांहून अधिक मुलांना संसर्गाची लागण झाली असल्याचे दिसून आले. महासाथीचा आजार सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये आढळलेला हा सर्वाधिक साप्ताहिक संसर्ग दर आहे. या दोन आठवड्यात १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, पूर्ण अमेरिकेत १० लाखांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे सरासरी चार नवीन करोनाबाधितांपैकी एक बाधित शालेय वयोगटातील मुले होती.

'या' चिमुकल्या देशाची कमाल; दोन वर्षाच्या मुलांचे करोना लसीकरण
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लहान मुलांसाठी असलेल्या रुग्णालयात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेच्या संसर्गजन्य आजार आणि रोग नियंत्रण केंद्राच्या (सीडीसी) आकडेवारीनुसार, सहा सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात जवळपास २५०० मुलांना करोनामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. ही संख्या पूर्वीपेक्षा अधिक आहे. ५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान साडे सात लाख मुले करोनाबाधित आढळली.

करोनाचा संसर्ग फैलावल्याप्रकरणी दोषी; पाच वर्षाचा कारावास
सीडीसीच्या अहवालानुसार, महासाथीच्या आजारादरम्यान, अमेरिकेत जवळपास ५० लाख मुलांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यापैकी सुमारे ४४४ जणांना मृत्यू झाला आहे. सीडीसीने ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डेल्टा वेरिएंटमुळे बाल रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या दरात पाच पटीने वाढ झाली. जून-ऑगस्ट महिन्याच्या कालावधीचा विचार करता, चार वर्षाखालील मुले आणि १२ ते १७ वर्ष या वयोगटातील मुलांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण १० पटीने अधिक होती.

करोना लस घेतल्यानंतर संसर्गाचा किती धोका?; संशोधनात 'हा' दावा!
अमेरिकेत १२ वर्षावरील मुलांसाठी लसीकरण सुरू आहे. रुग्णालयात करोनामुळे दाखल असणाऱ्या मुलांमध्ये बहुतांशी मुलांना करोना लस देण्यात आली नव्हती. त्यामुळे करोना लशीमुळे आजारामुळे गंभीर परिस्थिती होत नसल्याचे समोर आले. करोना लशीशिवाय, मास्कचा वापर, सॅनिटायझर्सने हात स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टेंसिगचा वापरामुळे करोनापासून बचाव होऊ शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज