अ‍ॅपशहर

‘दलाई लामा यांची भेट घेणे हा गुन्हा’

तिबेटचे सर्वोच्च नेते दलाई लामा यांची भेट घेणे हा गुन्हा असल्याचा इशारा चीनने जागतिक नेत्यांना दिला आहे. दलाई लामा हा विभाजनवादी नेते असून ते तिबेट तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही चीनने म्हटले आहे.

Maharashtra Times 22 Oct 2017, 4:38 am
बीजिंग : तिबेटचे सर्वोच्च नेते दलाई लामा यांची भेट घेणे हा गुन्हा असल्याचा इशारा चीनने जागतिक नेत्यांना दिला आहे. दलाई लामा हा विभाजनवादी नेते असून ते तिबेट तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही चीनने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dalai lama meeting is a crime
‘दलाई लामा यांची भेट घेणे हा गुन्हा’


चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी उपमंत्री चांग यिचिओंग यांनी पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत सांगितले की, ‘बीजिंगशी राजनैतिक संबंध असलेल्या सर्व सरकारने तिबेट हा चीनचा अंतर्गत भाग असल्याचे मान्य केले पाहिजे. दलाई लामा यांची भेट घेण्याचे कोणताही देश किंवा कोणतीही संघटना मान्य करीत असेल तर आमच्या दृष्टीने तो गंभीर गुन्हा आहे. धर्मगुरू म्हणून दलाई लामा यांची भेट घेण्याचा युक्तिवाद चीन मान्य करणार नाही. लामा हे धर्माच्या मुखवट्याखालील राजकीय नेते आहेत. ते १९५९ मध्ये अन्य देशात (भारत) पळून गेले आणि तेथून त्यांनी त्यांचे तथाकथित सरकार स्थापन केले आहे. या तथाकथित सरकारचा तिबेटला चीनपासून तोडण्याचा कार्यक्रम आहे. कोणत्याही सरकारने लामा यांच्या गटाला मान्यता दिलेली नाही. काही मोजके देश आणि नेते त्यांना आमंत्रित करीत आहेत. या देशांनी चीनच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज