अ‍ॅपशहर

बार्सिलोनानंतर फिनलँड, जर्मनीत हल्ले; ३ ठार

फिनलँडच्या टुर्कू शहरात एका व्यक्तिने अनेकांवर चाकू हल्ला केला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हून अधिक जण जखमी आहेत. तर जर्मनीतील वुप्पेर्टल शहरात एकाची हत्या करण्यात आली. बार्सिलोनात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटनांकडे त्याच संशयातून बघितले जात आहे.

Maharashtra Times 18 Aug 2017, 11:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त । हेलसिंकी, बर्लीन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम day after barcelona attack two killed in stabbing incidents in finland germany
बार्सिलोनानंतर फिनलँड, जर्मनीत हल्ले; ३ ठार

फिनलँडच्या टुर्कू शहरात एका व्यक्तिने अनेकांवर चाकू हल्ला केला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हून अधिक जण जखमी आहेत. तर जर्मनीतील वुप्पेर्टल शहरात एकाची हत्या करण्यात आली. बार्सिलोनात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटनांकडे त्याच संशयातून बघितले जात आहे.

टुर्कू शहरातील हल्लेखोराला पोलिसांनी गोळी मारली. ही गोळी त्याच्या पायाला लागली. फिनलँड पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच या घटनेत आणखी काही हल्लेखोर सामील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टुर्कू शहरच्या मधोमध असलेल्या भागात अनेक जण जखमी अवस्थेत पडलेले दिसून आलेत. यामुळे या भागात नागरिकांनी जावू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. जखमी झालेल्यांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे.

जर्मनीतील वुप्पेर्टल शहरात दोघांवर हल्ला करण्यात आला. यात एक जण ठार तर एक जखमी आहे. या घटनेतील हल्लेखोर फरार आहेत. या घटनेत एक किंवा त्यापेक्षा अधिक हल्लेखोर सामील असल्याचा संशय पोलिसांना आहे. स्पेनच्या बार्सिलोनामध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बार्सिलोनातील हल्ल्यात १४ जण ठार झालेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज