अ‍ॅपशहर

बगदादमध्ये दुहेरी आत्मघाती हल्ला; २८ ठार, ७३ जखमी; व्हिडिओ व्हायरल

Baghdad Suicide Attack: मध्य बगदादमध्ये दोन आत्मघाती बॉम्बस्फोट हल्ले झाले. या आत्मघाती हल्ल्यात २८ जण ठार झाले असून ७३ जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2021, 5:39 pm
बगदाद: इराकची राजधानी बगदाद गुरुवारी आत्मघाती हल्ल्याने हादरली. मध्य बगदादमध्ये झालेल्या या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात २८ जण ठार झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, ७३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Iraq-suicide-attack
बगदादमध्ये दुहेरी आत्मघाती बॉम्बस्फोट


मागील तीन वर्षातील बगदादमधील हा सर्वात भीषण हल्ला आहे. बगदादमझील टायेरान स्क्वेअरमधील कपड्यांच्या बाजारात हा हल्ला झाला. इराकच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, पहिला आत्मघाती हल्लेखोर आजारी असल्याचे कारण देत बाजारात घुसला. त्याच्याजवळ गर्दी वाढल्यानंतर त्याने स्फोट घडवून आणला. तर, या हल्ल्यानंतर मृतदेह व जखमींच्या शेजारी लोक जमली असतानाच दुसरा आत्मघाती हल्ला झाला असल्याची माहिती इराकच्या गृहमंत्रालयाने दिली.

पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीत काहीजण जखमी; बलुचिस्तानमध्ये संतापाची लाट




पाहा: 'असे' आहे चीनने अरुणाचलमध्ये वसवलेले गाव!

एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसर रिकामा केला आहे. तर, घटनास्थळी मृतदेह, रक्ताचे सडे पडल्याचे विदारक चित्र असल्याची माहिती एएफपीच्या वृत्तछायाचित्रकाराने दिली.

गुरुवारी झालेला हा हल्ला इराकमध्ये वर्ष २०१८ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा भीषण हल्ला आहे. त्यावेळीही टायेरान स्क्वेअरमध्ये हल्ला झाला होता. त्यावेळी ३० जणांचा मृत्यू झाला होता. इराकमध्ये येत्या काही महिन्यात संसदीय निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच हा आत्मघाती हल्ला झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज